Tejas | ‘धाकड’नंतर कंगना रनौत नव्या मिशनवर, पहिल्यांदाच दिसणार हवाई दलाच्या गणवेशात!

बॉलिवूड अभिनेत्री कंगन रनौत (Kangana Ranaut) एकापाठोपाठ एक चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करत आहे आणि त्याचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर करत आहे. आता अलीकडेच, इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर करून कंगनाने सांगितले की, तिने 'तेजस'चे शूटिंग सुरू केले आहे.

Tejas | ‘धाकड’नंतर कंगना रनौत नव्या मिशनवर, पहिल्यांदाच दिसणार हवाई दलाच्या गणवेशात!
कंगना रनौत
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 12:48 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) एकापाठोपाठ एक चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करत आहे आणि त्याचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर करत आहे. आता अलीकडेच, इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर करून कंगनाने सांगितले की, तिने ‘तेजस’चे शूटिंग सुरू केले आहे. फोटो पोस्ट करत तिने लिहिले, ‘आता मी माझ्या पुढच्या मिशनवर जात आहे.. आजपासून मिशन सुरू होत आहे.. माझा उत्साह आणखी वाढत आहे आणि याचे कारण आहे माझी अद्भुत टीम’.

कंगना पहिल्यांदाच दिसली गणवेशात

या फोटोत कंगना हवाई दलाच्या गणवेशात दिसत आहे आणि यावेळी ती खूपच सुंदर दिसत आहे. या चित्रपटात कंगना भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाने याआधी अनेक भिन्न पात्रे साकारली आहेत पण पहिल्यांदा ती गणवेशात दिसली आहे. या चित्रपटाची कथा भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना समर्पित करण्यात आली आहे.

पाहा पोस्ट

प्रसिद्ध निर्माता रॉनी स्क्रूवालाच्या आरएसव्हीपी प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. तसेच, सर्वेश मेवाडा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. काही दिवसांपूर्वी, त्याची पहिली झलक दाखवताना कंगनाने सांगितले की, ती या चित्रपटाचा एक भाग बनणार आहे. चित्रपटाच्या नाव आणि पोस्टरवरून असेही समजले आहे की, हा चित्रपट केवळ हवाई दलाच्या शूर वैमानिकांची कथा नाही, तर भारताच्या एकमेव स्वदेशी प्रगत लाइट कॉम्बॅट विमान तेजसची कथा आहे.

‘धाकड’चे शुटींग पूर्ण

याआधी कंगनाने नुकतेच ‘धाकड’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. कंगना देखील या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे. धाकडचे शूटिंग संपल्यानंतर तिने तिचे काही फोटो शेअर केले, जे चाहत्यांना खूप आवडले. मात्र, काही वापरकर्त्यांनी तिच्या बोल्ड चित्रांसाठी तिला ट्रोल केले.

‘थलायवी’ रिलीजसाठी सज्ज

कंगनाने धाकडचे शूटिंग पूर्ण केले आणि तेजसचे शूटिंग सुरू केले, तर दुसरीकडे तिचा ‘थलायवी’ चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटात ती तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारत आहे. चाहत्यांना चित्रपटाचा ट्रेलर आवडला असून, आता प्रत्येकजण या चित्रपटाच्या रिलीजबद्दल उत्सुक आहे.

यासोबतच कंगना आणीबाणीवर आधारित चित्रपटाचीही तयारी करत आहे, ज्यात ती देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने याच्या तयारीचीही काही छायाचित्रेही शेअर केली होती. चाहते कंगनाच्या या सर्व चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा :

मांडव सजलाय अंगणदारी, नटून थटून तयार नवरदेवाची स्वारी, स्वीटूच्या ओमच्या वेडिंग लूक पाहिलात का?

‘मला चार लोकांचे आभार मानायचे आहेत’, करण बूलानीची लग्नानंतर रियासाठी खास पोस्ट

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.