Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushmita Sen: ‘गोल्ड डिगर’, ‘लोभी’ म्हणणाऱ्यांना सुष्मिताने सुनावलं; म्हणाली, ‘मी सोनं नाही तर हिऱ्याला..’

पैसे पाहून ललित मोदी यांना डेट करतेय, असं म्हणणाऱ्यांनाही तिने सडेतोड उत्तर दिलं आहे. सुष्मिताच्या या पोस्टचं अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि नेटकरी कौतुक करत आहेत.

Sushmita Sen: 'गोल्ड डिगर', 'लोभी' म्हणणाऱ्यांना सुष्मिताने सुनावलं; म्हणाली, 'मी सोनं नाही तर हिऱ्याला..'
Sushmita Sen: 'गोल्ड डिगर', 'लोभी' म्हणणाऱ्यांना सुष्मिताने सुनावलंImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 9:54 AM

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि व्यावसायिक ललित मोदी (Lalit Modi) यांच्या रिलेशनशिपबाबत जोरदार चर्चा आहे. ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुष्मितासोबतचं नातं जाहीर करताच नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. या दोघांना प्रचंड ट्रोलदेखील (Trolling) करण्यात आलं. सुष्मिताने पैसे बघून ललित यांना डेट केलं, अशीही टीका अनेकांकडून झाली. या सर्व टीकाकारांना आधी ललित मोदी यांनी मोठी पोस्ट लिहित उत्तर दिलं. त्यानंतर आता सुष्मितानेही ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिलं आहे. सुष्मिता सध्या व्हेकेशनवर असून तिथले फोटो पोस्ट करत तिने एक पोस्ट लिहिली आहे. पैसे पाहून ललित मोदी यांना डेट करतेय, असं म्हणणाऱ्यांनाही तिने सडेतोड उत्तर दिलं आहे. सुष्मिताच्या या पोस्टचं अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि नेटकरी कौतुक करत आहेत.

सुष्मिता सेनचं उत्तर-

‘माझ्या अस्तित्त्वात आणि विवेकात मी पूर्णपणे केंद्रीत आहे. सर्व सृष्टी विलीन करून निसर्ग ज्याप्रकारे एकतेचा अनुभव देते, ते मला खूप आवडतं आणि जेव्हा आपण हा समतोल मोडतो, तेव्हा आपण विभाजित होतो. आपल्या आजूबाजूचं जग किती दयनीय आणि दुःखी होत चाललं आहे हे पाहून वाईट वाटतं. तथाकथित बुद्धीजीवी लोक त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण गोष्टींसह, कधी मजेशीर तर कधी खालच्या दर्जाचे गॉसिप करणारे अज्ञानी, मला कधीही न भेटलेले मित्र आणि ज्यांना मी ओळखतही नाही असे लोक.. सर्वचजण त्यांची माझं जीवन आणि चारित्र्याबद्दल मतांची देवाणघेवाण करत आहेत. मला ‘गोल्ड डिगर’ म्हणत आहेत. पण मी सोन्याच्याही पुढचा विचार करते आणि मी नेहमीच डायमंड्सना प्राधान्य दिलं आहे आणि हो.. ते मी स्वत: माझ्यासाठी खरेदी करते. माझ्या शुभचिंतकांचे मी मनापासून आभार मानते. तुमची सुश पूर्णपणे बरी आहे.. कारण मी कधीच इतरांची मंजुरी आणि टाळ्यांच्या क्षणिक कडकडाटावर जगले नाही. मी सूर्य आहे.. माझ्या अस्तित्वात आणि माझ्या विवेकामध्ये मी पूर्णपणे केंद्रीत आहे,’ अशी पोस्ट तिने लिहिली आहे.

हे सुद्धा वाचा

‘ती पैशांसाठी विकली गेली का?’

लेखिका तस्लीमा नसरीन यांनीसुद्धा एक पोस्ट लिहित सुष्मिता-ललित यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केला होता. ‘सुष्मिता आता एका अतिशय अनाकर्षक दिसणाऱ्या व्यक्तीसोबत वेळ घालवत आहे, जो विविध गुन्ह्यांमध्ये अडकलेला आहे. कारण तो माणूस खूप श्रीमंत आहे? म्हणून ती पैशाला विकली गेली का? कदाचित ती त्या माणसाच्या प्रेमात आहे. पण ती प्रेमात आहे यावर विश्वास ठेवू इच्छित नाही. जे पैशाच्या प्रेमात पडतात, त्यांच्याबद्दल आदराची भावना माझ्या मनातून खूप लवकर उतरते,’ असं त्यांनी लिहिलं होतं.

ललित मोदी यांची पोस्ट-

ललित मोदींनी इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहित त्यांच्याबद्दल व्हायरल होत असलेल्या फेक न्यूजवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच त्यांनी या पोस्टद्वारे स्वत:ला ट्रोल केल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. “मला वाटतं की आपण अजूनही मध्ययुगात जगत आहोत. दोन व्यक्ती एकमेकांचे चांगले मित्र होऊ शकत नाहीत का? आणि दोघांमुळे केमिस्ट्री चांगली असेल आणि वेळ चांगली असेल तर जादूई पद्धतीने गोष्टी घडू शकतात. माझा सल्ला हाच असेल की जगा आणि इतरांना जगू द्या,” असं त्यांनी लिहिलं.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.