Shah Rukh Khan | पठाणनंतर शाहरुख खान याच्या या चित्रपटाला लागले मोठे ग्रहण

जवळपास चार वर्षांनंतर शाहरुख हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय.

Shah Rukh Khan | पठाणनंतर शाहरुख खान याच्या या चित्रपटाला लागले मोठे ग्रहण
Follow us
| Updated on: Dec 17, 2022 | 5:28 PM

मुंबई : शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटातील गाण्यामुळे मोठा वाद सुरू आहे. 2023 मध्ये शाहरुख खान याचे तब्बल तीन मोठे चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. यापैकी डंकी हा देखील एक चित्रपट आहे. 2023 मध्ये पठाण चित्रपटाच्यानंतर शाहरुख खान डंकी या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत आहे. जवळपास चार वर्षांनंतर शाहरुख हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय. परंतू पठाण चित्रपटामुळे मोठा वाद निर्माण झालाय.

शाहरुख खानच्या डंकी चित्रपटाची शूटिंग आता जबलपूर येथील भेडाघाट येथे सुरू आहे. मात्र, पठाण चित्रपटाच्या बेशर्म रंग या गाण्याचा फटका हा शाहरुख खानच्या डंकी चित्रपटाला बसला आहे.

शाहरुख खान त्याच्या डंकी चित्रपटाच्या शूटिंगसाठी जबलपूरमधील भेडाघाट येथे पोहोचला होता. मात्र, यावेळी शाहरुख खान याला लोकांच्याविरोधाला सामोरे जाण्याची वेळ आली.

इतकेच नाहीतर लोकांचा रोष इतका जास्त वाढला की, अर्ध्यामध्येच शूटिंग थांबवण्याची वेळ चित्रपट निर्मात्यांवर आली. शाहरुख खान हा येथे डंकी चित्रपटाची शूटिंग करत होता.

रिपोर्टनुसार ज्याठिकाणी शाहरुख खान याची शूटिंग सुरू होती. तिथे आंदोलकांची गर्दी वाढली. यावेळी काहींनी काळ्या रंगाचे झेंडे देखील हातामध्ये घेतले होते. शाहरुख खान विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली जात होती.

चित्रपटाच्या सेटवर हनुमान चालीसाचे पठण देखील करण्यात आले. यावेळी पोलिस देखील मोठ्या संख्येने तेथे उपस्थित होती. पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यापासून चित्रपट निर्मात्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.