प्रियांका चोप्रा हिच्यानंतर या गायिकेने केली बाॅलिवूडवर टिका, थेट लावला हा अत्यंत गंभीर आरोप
प्रियांका चोप्रा ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये दाखल झालीये. प्रियांका चोप्रा हिने एक मुलाखत दिलीये, ज्यामध्ये तिने काही मोठे आणि धक्कादायक खुलासे केले आहेत. प्रियांका चोप्रा हिचे बोलणे ऐकून अनेकजण हैराण झाले होते.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने काही दिवसांपूर्वीच मोठा धक्कादायक खुलासा करत सर्वांना हैराण केले होते. प्रियांका चोप्रा हिने एका मुलाखतीमध्ये बाॅलिवूडमधील काळे सत्य सांगून टाकले होते. प्रियांका चोप्रा म्हणाली होती की, कशाप्रकारे आपल्याला बाॅलिवूडमध्ये एका कोपऱ्यात टाकण्याचे काम सुरू होते. इतकेच नाहीतर प्रियांका चोप्रा थेट म्हणाली, मला बाॅलिवूड (Bollywood) चित्रपटांमध्ये मुद्दाम काम दिले जात नव्हते. मी बाॅलिवूडमधील राजकारणाला (Politics) कंटाळून थांबण्याचा निर्णय घेतला होता. कारण त्यांच्यासारखे राजकारण करणे मला अजिबात शक्य नव्हते.
प्रियांका चोप्रा हिच्या या खुलाश्यानंतर अनेकांनी प्रियांका चोप्रा हिचा सपोर्ट केला. कंगना राणावत, विवेक अग्निहोत्री यांनी प्रियांका चोप्रा हिचा सपोर्ट करत सोशल मीडियावर पोस्टही शेअर केल्या. प्रियांका चोप्रा ही काही दिवसांपूर्वीच भारतामध्ये दाखल झालीये. विशेष म्हणजे यावेळी ती मुलगी मालती आणि पती निक जोनस यांना घेऊन भारतामध्ये आलीये.
प्रियांका चोप्रा हिच्या या आरोपानंतर आता एका गायिकेने देखील मोठे भाष्य केले आहे. विशेष म्हणजे तिने यापूर्वी काही बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाणेही म्हटले आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून तिला गाणे गाण्याची संधी मिळाली नाहीये, शेवटी तिने आपल्या मनातील खदखद व्यक्त केलीये. या गायिकेने अत्यंत धक्कादायक माहिती देखील सांगितले आहे.
गायक कंपोजर शिबानी कश्यप हिने बाॅलिवूडवर आता काही गंभीर आरोप केले आहेत. पाच वर्षांपूर्वी तिने शेवटचे बाॅलिवूड गाणे गायले आहे. आता शिबानी कश्यप ही लाइव शो करण्यावर भर देते. शिबानी कश्यप म्हणाली की, मी काम मागण्यापेक्षा अधिक काम करण्यावर जास्त भर देते. शिबानी कश्यप ही बाॅलिवूडचे गाणे गाण्यास तयार आहे, मात्र तिला अशा ठिकाणी काम मागण्यासाठी अजिबात जायचे नाही, जिथे तिला कामच मिळणार नाही.
शिबानी पुढे म्हणाली, बॉलिवूडमध्ये कॅम्प आहे. त्यांनी गायक-वादक अगोदरच ठरवले आहेत. तिथे इतर कोणालाही अजिबात प्रवेश नाही, त्यामुळे अशा ठिकाणी जाण्यात काहीच अर्थ नाही असे मला वाटते. लोकांनी माझे संगीत ऐकावे आणि प्रेक्षकांचे प्रेम मिळावे अशी माझी इच्छा आहे. आता शिबानी कश्यप हिचे हे विधान ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावरही लोक शिबानी कश्यप हिला सपोर्ट करताना दिसत आहेत.