करण कुंद्रा याच्यासोबत रोमान्स करणे 12 वर्षाच्या रीवा अरोडा हिला पडले महागात, थेट
इतकेच नाहीतर याबद्दलची एक पोस्टही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
मुंबई : उरी या चित्रपटामधून खरी ओळख मिळालेली रीवा अरोडा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. कारण रीवाचा एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता की, तो व्हिडीओ पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. अवघ्या 12 वर्षाच्या रीवाने थेट 38 वर्षाच्या माणसासोबत रोमान्स केला होता. हा व्हिडीओ पाहून तिच्यावर प्रचंड टिका केली जात होती. आता यावर थेट रीवाच्या आईने मोठे पाऊल उचलले आहे. इतकेच नाहीतर याबद्दलची एक पोस्टही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
रीवा ही अवघी 12 वर्षाची आहे आणि एका व्हिडीओमध्ये तिने टीव्ही अभिनेता करण कुंद्रा याच्यासोबत रोमान्स केला होता. विशेष म्हणजे करण याचे वय 38 आहे आणि हीच गोष्ट अनेकांना खटकली होती. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी रीवावर टीका केली.
निशा अरोडा ही रीवा अरोडाची आई आहे. निशा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुलीच्या त्या व्हिडीओबद्दल सर्वांची माफी मागितली आहे. इतकेच नाहीतर त्यांनी आता रीवाचे इंस्टाग्राम अकाउंट देखील बंद केल्याचे सांगितले आहे.
View this post on Instagram
करण कुंद्रासोबत रीवा हिने एक रील तयार केले होते. या रीलमध्ये बारचा सेटअप दिसत होता आणि करण कुंद्रा हा रीवाचा बॉयफ्रेंड बनला होता. इतकेच नाहीतर यामध्ये रीवाचे अजून एका मुलासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचे दाखवण्यात आले होते.
रीवा या रीलमध्ये करण कुंद्रासोबत रोमान्स करताना देखील दिसली होती. इतक्या कमी वयामध्ये असे करणे चुकीचे असल्याचे अनेकांचे म्हणणे होते. आता यावर रीवाच्या आईने थेट माफी देखील मागितली आहे.
View this post on Instagram
गेल्या काही वर्षांपासून करण कुंद्रा हा अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिला डेट करतोय. हे दोघे अनेकदा स्पाॅट होतात. इचकेच नाहीतर करण आणि तेजस्वी लवकरच लग्न करणार असल्याची देखील चर्चा आहे