कियारा अडवाणी आलिया भट्ट हिच्यासारखीच लग्नापूर्वीच प्रेग्नेंट? तो व्हिडीओ पाहून चर्चांना उधाण
जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये कियारा आणि सिद्धार्थ यांनी सात फेरे घेतले. लग्नाच्या तीन दिवस अगोदर विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.
मुंबई : अत्यंत शाही थाटामध्ये कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा विवाहसोहळा पार पडलाय. हे लग्न खासगी पध्दतीने अत्यंत कमी पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये राजस्थान येथील जैसलमेर येथे पार पडले आहे. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नानंतर अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) यांच्या लग्नाची संपूर्ण झलक बघायला मिळत आहे. जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये कियारा आणि सिद्धार्थ यांनी सात फेरे घेतले. लग्नाच्या तीन दिवस अगोदर विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. पाहुण्यांसाठी सूर्यगढ पॅलेसमध्ये तब्बल ८० रूम बुक करण्यात आल्या होत्या. या पॅलेसचे एका दिवसाचे भाडे तब्बल २ ते ३ कोटी असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले होते. करण जोहर याने कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना लग्नाचे अत्यंत मोठे गिफ्ट दिले आहे.
नुकताच सोशल मीडियावर कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक चर्चांना उधाणे आले असून अनेकांनी कियारा अडवाणी ही प्रेग्नेंट असल्याचे म्हटले आहे.
वीरल भियानी याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गाडीमधून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी उतरताना दिसत आहेत. काही लोकांनी कियाराची बॉडी लँग्वेज पाहिली आणि आलिया भट्ट हिच्याप्रमाणेच कियारा अडवाणी प्रेग्नेंट असल्याचे म्हटले.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कियारा अडवाणी ही वारंवार आपले पोट स्कार्फने झाकण्याचा प्रयत्न करत आहे. इतकेच नाही तर अनेकांनी म्हटले आहे की, आलिया भट्ट हिच्याप्रमाणेतच कियारा देखील लग्नाच्या अगोदरच प्रेग्नेंट होती.
व्हिडीओवर कमेंट करत एक युजर्स म्हणाला की, लिहून घ्या, कियारा ही प्रेग्नेंट आहे…दुसऱ्या युजर्सने लिहिले की, कियारा सतत स्कार्फने का पोट झाकत आहे? काहीही असो खूप खूप अभिनंदन…
तिसऱ्या युजर्सने लिहिले की, आलिया भट्टप्रमाणे कियाराही लवकरच आई होणार आहे. अजून एका युजर्सने लिहिले की, कियारा ज्यापध्दतीने पोट झाकत आहे, त्यावरून मला संशय येत आहे.
आता कियारा अडवाणी हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांना हा व्हिडीओ पाहून कियारा अडवाणी ही प्रेग्नेंट असल्याचेच वाट आहेत.