पठाण चित्रपटाच्या यशानंतर अनुराग कश्यप यांनी शाहरुख खान याच्याबद्दल केले मोठे विधान, म्हणाले तो…
पठाण चित्रपट हा फक्त भारतामध्येच नाहीतर जगभरामध्ये चांगली कमाई करतोय. अवघ्या पाच दिवसांमध्ये पठाण चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत.
मुंबई : शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण (Pathaan) हा चित्रपट ठरला आहे. पठाण चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहे. चित्रपटाला रिलीज होऊन फक्त पाच दिवस झालेले असताना अनेक रेकाॅर्ड चित्रपटाने आपल्या नावावर केले. प्रेक्षकांमध्ये शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाबद्दल एक वेगळीच क्रेझ बघायला मिळत आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ (Video) व्हायरल होताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये थिएटरमध्ये पठाण चित्रपटातील गाणे लागले की, चाहते डान्स करताना दिसत आहेत. इतकेच नाहीतर काही जण हे थिएटरमधील खुर्च्यांवर उभे राहून डान्स करत व्हिडीओ शूट करत आहेत. चाहत्यांमध्ये पठाण चित्रपटाद्दल एक वेगळाच उत्साह बघायला मिळतोय. सोशल मीडियावर तर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये चाहते पठाण चित्रपटामधील गाणे थिएटरमध्ये लागल्यावर थेट फटाके फोडून आनंद व्यक्त करत आहेत. मात्र, आपल्या उत्साहाच्या नादामध्ये अनेकांचा जीव देखील धोक्यात घालत आहेत.
पठाण चित्रपट हा फक्त भारतामध्येच नाहीतर जगभरामध्ये चांगली कमाई करतोय. अवघ्या पाच दिवसांमध्ये पठाण चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. विशेष म्हणजे चित्रपटाची ओपनिंग देखील धडाकेबाज ठरली.
शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन पाहून अनेकांनी शाहरुख खान याचे काैतुक केले आहे. यामध्ये बाॅलिवूडमधील अनेक कलाकार तसेच चित्रपट निर्मात्यांचा देखील समावेश आहे.
शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून हे पुन्हा एकदा दाखून दिले आहे की, त्याला उगाच बाॅलिवूडचा बादशाह म्हणत नाहीत. कोरोनानंतर बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात असतानाच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट सुपरहिट ठरलाय.
शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाचे काैतुक करत चित्रपट निर्माता अनुराग कश्यप यांनी एका मुलाखतीमध्ये मोठे विधान केले आहे. यावेळी अनुराग कश्यप म्हणाले की, लोक पठाण चित्रपटामुळे परत एकदा थिएटरकडे वळले आहेत.
विशेष म्हणजे लोक नुसतेच येत नाहीत चित्रपटाच्या वेळी डान्स करत आहेत. लोक हा चित्रपट साजरा करत आहेत… हे उत्सवाचे वातावरण आहे आणि हा उत्सव खूपच सुंदर आहे. इतके दिवस आम्ही सर्वजण या उत्सवाला मिस करत होतो.
पुढे अनुराग कश्यप म्हणाले, मजबूत हाडे आणि लवचिकता असलेला माणूस, ज्याने सर्व काही शांतपणे सहन केले आणि आपल्या कामामधूनच उत्तर दिले…खरोखरच हे खूपच सुंदर आहे…
यावेळी त्याचा आवाज स्क्रीनवर बुलंद आहे. मी नक्कीच सांगू शकतो की, त्याला काय म्हणायचे होते…त्याने म्हटले, तुम्ही तुमचे काम करा…विनाकारण काहीही बोलू नका…तुम्ही पाहू शकता शाहरुख खान जसा आहे तसाच आहे, असे अनुराग कश्यप म्हणाले.