Union Budget 2023 | अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त करत सरकारवर चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी केला मोठा आरोप, म्हणाले कायमच…

या बजेटकडून प्रत्येक क्षेत्रातील लोकांना अपेक्षा होत्या. कोरोनानंतर बाॅलिवूडला मोठा फटका बसला आहे. कोरोनानंतर बाॅलिवूडचे (Bollywood) चित्रपट सातत्याने फ्लाॅप जाताना दिसत आहेत.

Union Budget 2023 | अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त करत सरकारवर चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी केला मोठा आरोप, म्हणाले कायमच...
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 3:47 PM

मुंबई : 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचा अर्थसंकल्प हा देशासमोर सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. विशेष म्हणजे निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या कार्यकाळातील हा पाचवा अर्थसंकल्प सादर केला आहे. या बजेटकडून प्रत्येक क्षेत्रातील लोकांना अपेक्षा होत्या. कोरोनानंतर बाॅलिवूडला मोठा फटका बसला आहे. कोरोनानंतर बाॅलिवूडचे (Bollywood) चित्रपट सातत्याने फ्लाॅप जाताना दिसत आहेत. बाॅलिवूडच्या मोठ्या स्टारचे चित्रपट फ्लाॅप गेले आहेत. यामध्ये आमिर खान, रणवीर सिंह आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांच्या चित्रपटाचा समावेश आहे. बाॅलिवूड ही एक मोठी इंडस्ट्री आहे. मात्र, 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये बाॅलिवूड इंडस्ट्रीच्या पदरी निराशा पडली आहे. बाॅलिवूड इंडस्ट्रीला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या.

देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. मात्र, या अर्थसंकल्पामध्ये बाॅलिवूड इंडस्ट्रीला काहीच मिळाले नाहीये. नाही चित्रपटाचे दर कमी झाले नाही बाॅलिवूड इंडस्ट्रीकडे कोणी लक्ष दिले.

आता चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी या बजेटवर नाराजी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्पाबाबत आता अशोक पंडित यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. अशोक पंडित हे इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत.

अशोक पंडित हे ANI सोबत बोलताना म्हणाले की, मनोरंजनमध्ये चित्रपट, टेलिव्हिजन, ओटीटी आणि शो यांचा समावेश होतो. अर्थसंकल्पामध्ये मनोरंजन इंडस्ट्रीला काहीतरी मिळेल अशी अपेक्षा नक्कीच होती.

मुळात म्हणजे कोणतेच सरकार हे मनोरंजन इंडस्ट्रीला महत्व देत नाही. आम्ही सरकारसोबत चर्चा केली…संपर्क केला…परंतू आमच्या इंडस्ट्रीबद्दल ते फार जास्त गंभीर नाहीत.

बजेटमध्ये इतर सर्व इंडस्ट्रीला महत्व दिली जाते. याला फक्त मनोरंजन इंडस्ट्रीच अपवाद आहे. वस्त्रोद्योग असो किंवा साबण उद्योग असो यांच्याकडे कायमच लक्ष दिले जाते. या सर्वांना महत्वाचे मानले जाते. याच्यावर चर्चा देखील होतात.

पुढे अशोक पंडित म्हणाले, विशेष म्हणजे आमच्या मनोरंजन इंडस्ट्रीमधून मोठा कर भरला जातो. तरीही आमच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जात नाही. कोरोनाच्या काळात आमच्या इंडस्ट्रीने खूप चांगले काम केले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.