सिद्धार्थच्या ‘शेरशाह’चा ट्रेलर पाहून विक्रम बत्रांचे आई-वडील म्हणतात, ‘हीच आमच्या मुलाला खरी श्रद्धांजली!’

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​( Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) स्टारर फिल्म 'शेरशाह' (shershaah) चा ट्रेलर काल म्हणजेच रविवारी लाँच झाला.

सिद्धार्थच्या ‘शेरशाह'चा ट्रेलर पाहून विक्रम बत्रांचे आई-वडील म्हणतात, ‘हीच आमच्या मुलाला खरी श्रद्धांजली!’
विक्रम बत्रा
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 11:30 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​( Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) स्टारर फिल्म ‘शेरशाह’ (shershaah) चा ट्रेलर काल म्हणजेच रविवारी लाँच झाला. ‘कारगिल दिवसा’च्या बरोबर एक दिवस आधी हा ट्रेलर भारतीय सैन्य दलाच्या जवानांसह कारगिलच्या द्रास येथे सीडीएस जनरल विपिन रावल यांच्यासमवेत चित्रपटाच्या टीमने लाँच केला होता. या चित्रपटात कारगिल युद्धामध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रांची (Vikram Batra) शौर्य गाथा दाखवली जाणार आहे.

यावेळी कॅप्टन विक्रम बत्रा यांचा भाऊही उपस्थित होता, परंतु काही कारणास्तव त्यांचे आई-वडील या कार्यक्रमात भाग घेऊ शकले नाहीत. तथापि, या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर ते म्हणाले की, हा चित्रपट एका सैनिकाला खरी श्रद्धांजली आहे.

1999च्या कारगिल युद्धाच्या वेळी कॅप्टन विक्रम बत्रा यांनी 16,000 फूट उंच भागात शत्रूशी लढा दिला होता. त्याचे बलिदान गेले होते. आयएएनएसच्या वृत्तानुसार विक्रम बत्राच्या आई-वडिलांनी सांगितले होते की, हा त्यांच्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे आणि देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या सैनिकाला हा चित्रपट खरा श्रद्धांजली आहे आणि त्याच्या शौर्यासाठी पाकिस्तानसह जगभरात त्यांची ओळख आहे. त्यांचे प्रचंड चाहते आहेत.

एका सैनिकाला खरी श्रद्धांजली

कारगिल युद्धाच्या वेळी सर्वात कठीण मिशनसाठी अग्रणी म्हणून ‘परमवीर चक्र’ देऊन गौरवण्यात आलेल्या दिवंगत कॅप्टन बत्रा यांचे वडील-77 वर्षीय जी.एल. बत्रा म्हणाले, “युद्धावर आधारित ऐतिहासिक चित्रपट पाहून आम्हाला अभिमान वाटतो की, आमच्या मुलाची वास्तविक जीवन कथा यात दाखवली जाणार आहे. खरं तर त्याच्या बालपणापासून सुरू होणारा संघर्ष आयएमए (इंडियन मिलिटरी अकादमी) पर्यंत पोहोचतो आणि शेवटी भारतीय सैन्यात सामील होतो.”

ते म्हणाले की, त्यांच्या मुलाच्या जीवनावर आधारित हा चित्रपट ‘कारगिल’ युद्धातील नायकांना खरी श्रद्धांजली आहे. निर्मात्याने त्यांच्या जीवनावर बरेच संशोधन केले आहे. तथापि, त्यांना एका गोष्टीची खंत वाटते की, शहीदांच्या स्मृतींच्या दस्तऐवजीकरणास बराच विलंब होत असल्याचे वाटते. जर ते कारगिल युद्धानंतर दोन-चार वर्षात बनले असते, तर ते अधिक योग्य ठरले असते. आम्हाला अजूनही अभिमान वाटतो की, दिग्दर्शकाने कारगिल युद्धातील आमच्या नायक मुलाच्या जीवनावर बायोपिक बनवला आहे.

तमिळ दिग्दर्शक विष्णू वर्धन यांचा ‘शेरशाह’ हा चित्रपट 12 ऑगस्टला Amazon Prime Videoवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट ‘कारगिल’ नायकाला खरी श्रद्धांजली ठरेल. करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

(After watching the trailer of Siddharth’s ‘ shershaah’, Vikram Batra’s parents say, ‘This is a true tribute to our son!’)

हेही वाचा :

Nora Fatehi : नोरा फतेहीच्या हॉटनेसचा जलवा, ग्लॅमरस अवतारात फोटो शेअर

Anushka Sharma : लंडनमध्ये अनुष्का शर्माची फोटोग्राफर बनली अथिया शेट्टी, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.