Aishwarya Rai | ऐश्वर्या राय हिने केली बाॅलिवूड अभिनेत्रींची पोलखोल, चक्क या विषयांवर करतात चर्चा, चाहत्यांना बसला धक्का
ऐश्वर्या राय हिचा नुकताच चित्रपट रिलीज झालाय. ऐश्वर्या राय हिच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त असा प्रतिसाद हा मिळताना दिसतोय. ऐश्वर्या राय हिच्या चित्रपटाने कमाईमध्ये सलमान खान याच्या चित्रपटाला देखील मागे टाकले आहे. साऊथमध्ये पदार्पण हे ऐश्वर्या राय हिने केले आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) ही कायमच चर्चेत असते. ऐश्वर्या राय हिचा पोन्नियिन सेल्वन-2 हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय हिचा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसतोय. या चित्रपटाने कमाईमध्ये सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान या चित्रपटाला देखील मागे टाकले आहे. पोन्नियिन सेल्वन-2 (Ponniyin Selvan: II) चित्रपटामध्ये ऐश्वर्या राय ही महत्वाच्या भूमिकेत आहे. बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर (Box office) धमाल करू शकत नसल्यानेच ऐश्वर्या राय हिने साऊथ चित्रपटांकडे पाऊल टाकल्याचे बोलले जात आहे. मात्र, यावर काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय हिने स्पष्टीकरण दिले.
ऐश्वर्या राय हिच्या बाॅलिवूडमध्ये कोणी अभिनेत्री मैत्रिणी नाहीत फक्त अभिनेतेच हे ऐश्वर्या राय हिचे मित्र आहेत. अनेक पार्ट्यांमध्येही ऐश्वर्या राय ही अभिनेत्यांसोबतच सहभागी होताना दिसते. याचे कारण काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय हिने सांगितले. याचा खुलासा तिने थेट करण जोहर याच्या पुढेच केला. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चन याच्यासोबत करण जोहर याच्या शोमध्ये पोहचली होती. यावेळी करण जोहर याच्यासमोर ऐश्वर्या राय म्हणाली की, मुळात म्हणजे बाॅलिवूडमध्ये कोणतीच अभिनेत्री माझी मैत्रिण नाहीये. फक्त अभिनेतेच माझे मित्र आहेत. मी पार्ट्यांमध्येही त्यांच्यासोबतच जाते.
ऐश्वर्या राय म्हणाली की, कोणतीही अभिनेत्री माझी मैत्री न कोण्याचे कारणही तेवढेच मोठे आहे. कारण बाॅलिवूडमधील अभिनेत्री या सतत फक्त आणि फक्त त्यांच्या कपड्यांवर, मेकअप आणि कोण कसे दिसते, कोणाची पर्स कशी आहे, कुठून घेतली वगैरे यावरच चर्चा करतात. हे मला अजिबात आवडत नाही.
म्हणजे मी तशी चर्चा कधीच करत नाही. यामुळेच बाॅलिवूडमध्ये माझी एकही अभिनेत्री ही मैत्री नाहीये. अभिनेते कधीच अशा गोष्टींवर अजिबात चर्चा करत नाहीत. ऐश्वर्या राय हिचा जो हा व्हिडीओ व्हायरल होतोय, तो जुना आहे. काही वर्षांपूर्वी ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चन याच्याबोलत करण जोहर याच्या शोमध्ये पोहचली होती. ऐश्वर्या राय हिने केलेल्या या खुलाशानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते.