Singham Again | अजय देवगण ‘सिंघम 3’मध्ये करणार जबरदस्त अॅक्शन
कोरोनानंतर हा बाॅलिवूडचा पहिल्याच चित्रपट आहे, जो बाॅक्स आॅफिसवर धमाका करतोय.
मुंबई : अजय देवगणचा दृश्यम 2 हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाकेदार कामगिरी करतोय. सात दिवसांमध्ये या चित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार केलाय. कोरोनानंतर हा बाॅलिवूडचा पहिल्याच चित्रपट आहे, जो बाॅक्स आॅफिसवर धमाका करतोय. दृश्यम 2 नंतर भेडिया हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, म्हणावा तसा प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला नाही. दृश्यम 2 ला रिलीज होऊन 13 दिवस होत असताना देखील या चित्रपटाची जादू बाॅक्स आॅफिसवर कायम बघायला मिळतंय.
दृश्यम 2 चित्रपटामध्ये अजय देवगणने जबरदस्त अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता दृश्यम 2 नंतर अजय देवगणचा भोला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. रिपोर्टनुसार या चित्रपटाची शूटिंग अजयने सुरू देखील केलीये.
#Xclusiv… AJAY DEVGN – ROHIT SHETTY REUNITE FOR ‘SINGHAM AGAIN’… BIGGG NEWS… One of the most successful combinations ever – #AjayDevgn and director #RohitShetty – collaborate once again… For #SinghamAgain [yes, that’s the title]… Will start once #Ajay is free from #Bholaa. pic.twitter.com/K1z2PrS2um
— taran adarsh (@taran_adarsh) December 1, 2022
भोलानंतर अजय देवगणचा एक बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिंघम 3 हा चित्रपट देखील चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे भोलाचे शूटिंग पूर्ण करून लगेचच अजय देवगण हा सिंघम चित्रपटाची शूटिंग सुरू करणार आहे.
सिंघम 3 चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एका रोहित शेट्टी आणि अजय देवगण सोबत काम करणार आहेत. सिंघम चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचे प्रतिसाद चांगला मिळाला. आता सिंघम 3 काय धमाका करतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
तरण आदर्श याने सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर करत अजय देवगणच्या सिंघम अगेन चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे. यावर चाहते आता कमेंट करताना दिसत आहेत. सिंघम, सिंघम 2, गोलमाल या चित्रपटांमध्ये यापूर्वी अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांनी काम केले आहे.