Tanhaji Movie | तान्हाजी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर काजोलची पहिली प्रतिक्रिया, हा तर आपल्या सर्वांचाच विजय…

अजय देवगणला तान्हाजी द अनसंग वॉरिअर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. यानंतर अजय देवगण खूप आनंदात आहे. आता यावर त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री काजोलने आपली प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटात अजय आणि काजोल या दोघांनी एकत्र काम केले आहे.

Tanhaji Movie | तान्हाजी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर काजोलची पहिली प्रतिक्रिया, हा तर आपल्या सर्वांचाच विजय...
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 10:31 AM

मुंबई : 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकताच करण्यात आलीयं. ज्यामध्ये साऊथच्या आणि बॉलिवूडच्या (Bollywood) दोन चित्रपटांचा समावेश आहे. अभिनेता सुर्याच्या ‘सूरराई पोत्रू’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये 5 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तर बॉलीवूड स्टार अजय देवगणच्या ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ (Tanhaji) या चित्रपटालाही हा पुरस्कार देण्यात आलायं. या चित्रपटासाठी अजय देवगणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. अजय देवगणला (Ajay Devgn) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर आता त्याची पत्नी आणि अभिनेत्री काजोलने आपली प्रतिक्रिया दिलीयं.

अजय देवगणला तान्हाजी द अनसंग वॉरिअर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

अजय देवगणला तान्हाजी द अनसंग वॉरिअर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. यानंतर अजय देवगण खूप आनंदात आहे. आता यावर त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री काजोलने आपली प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटात अजय आणि काजोल या दोघांनी एकत्र काम केले आहे. या चित्रपटात काजोलही मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात तिने तानाजींच्या पत्नी सावित्रीबाईची भूमिका साकारली होती.

हे सुद्धा वाचा

चित्रपटाला पुरस्कार मिळाल्यानंतर काजोल म्हणाली की…

नुकताच काजोलने इंडिया टुडेला एक मुलाखत दिलीयं. त्यावेळी बोलताना काजोल म्हणाली की, हा चित्रपटाशी संबंधित सर्व लोकांचाच विजय आहे, कारण हा चित्रपट कोणा एका व्यक्तीने बनवला नाही. या चित्रपटासाठी अनेकांनी खूप जास्त मेहनत घेतलीयं. काजोल म्हणाली की ती खूप आनंदी आहे. तान्हाजी – द अनसंग वॉरिअर चित्रपटाने हा पुरस्कार जिंकल्याने मी खूप जास्त आनंदी आहे. हे सर्व मेहनतीचे फळ आहे. चित्रपटाशी निगडित प्रत्येकाचा हा विजय आहे. बोलताना काजोलचा आनंद स्पष्ट दिसत होता. यासोबतच काजोलने ज्युरींचेही आभार मानले आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर मानले पत्नीचे आभार

अजय देवगणने आपली पत्नी काजोलचे राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्याबद्दल आभार मानले आहेत. अजय देवगणने ट्विट करून लिहिले- ‘तुझेही अभिनंदन, चित्रपटातील तुझ्या उपस्थितीने ते आणखीन चांगले झाले. यापूर्वी काजोलने ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या बॉलिवूड चित्रपटासाठी 3 राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्याबद्दल अजय देवगण आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले होते. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट वेशभूषा, सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे 3 पुरस्कार मिळाले आहेत.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.