Nysa Devgn | अजय देवगण याच्या लेकीने केली सर्वांची बोलती बंद, वारंवार चुकीचे बोलत असल्याने थेट म्हणाली
बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण हा कायमच चर्चेत राहतो. काही दिवसांपूर्वीच अजय देवगण या भोला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विशेष म्हणजे अजय देवगण याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता अजय देवगण याची मुलगी चर्चेत आलीये.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हा कायम चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच अजय देवगण याचा भोला हा चित्रपट रिलीज झाला. भोलानंतर अजय देवगण याचा मैदान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अजय देवगण याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर (Box office) धमाल करताना दिसत आहेत. ज्यावेळी बाॅलिवूडच्या मोठ्या स्टारचे चित्रपट फ्लाॅप जात होते, त्यावेळी अजय देवगण याचे चित्रपट (Movie) धमाल करताना दिसले. काही दिवसांपूर्वीच भोला हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे अजय देवगण याच्या भोला चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय.
काही दिवसांपूर्वीच काजोल हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काजोल हिने धक्कादायक खुलासा करत सांगितले की, कशाप्रकारे रंगावरून आणि वाढलेल्या वजनामुळे आपली खिल्ली बाॅलिवूडमध्ये उडवली जायची. इतकेच नाहीतर काजोल म्हणाली की, माझी खिल्ली उडवणारी लोक आज तिथेच आहेत. मात्र, मी माझ्या करिअरमध्ये खूप जास्त प्रगती केलीये.
अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी नीसा देवगण हिने अजून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले नाहीये. मात्र, असे असताना देखील नीसा देवगण ही कायमच चर्चेत असते. नीसा देवगण ही सध्याच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार नाहीये. सध्या नीसा देवगण ही आपल्या मित्रांसोबत पार्टी आणि धमाल करण्यावर अधिक भर देते. काही दिवसांपूर्वी काजोल हिने म्हटले होते की, मी माझ्या मुलीच्या प्रत्येक निर्णयामध्ये तिच्यासोबत असणार आहे.
View this post on Instagram
कायमच नीसा देवगण ही आपल्या मित्रांसोबत स्पाॅट होते. अनेकदा नीसा देवगण हिचे पार्टीमधून बाहेर पडतानाचे व्हिडीओ वगैरे व्हायरल होतात. नीसा देवगण ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. बऱ्याचदा अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी सोशल मीडियावर ट्रोल देखील होते. नुकताच मित्रांसोबत पार्टीकरून येताना नीसा देवगण ही स्पाॅट झाली.
नीसा देवगण हिला पाहून पापाराझी हे न्यासा…न्यासा…न्यासा असा आवाज देत तिला थांबण्यासाठी सांगत होते. यावेळी नीसा देवगण ही गाडीमध्ये बसते आणि म्हणते की, माझे नाव नीसा आहे…कारण बरेच लोक न्यासा याच नावाने नीसा देवगण हिला आवाज देतात. यामुळे तिने स्पष्ट केले की, माझे नाव नीसा आणि न्यासा नाही. आता अजय देवगण याच्या लेकीचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये नीसा देवगण हिचा लूक जबरदस्त दिसतोय.