Drishyam 2 | ‘दृश्यम 2’चा बाॅक्स ऑफिसवर धमाका सुरूच, 200 कोटीच्या क्लबमध्ये सामील
आता रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी अजयच्या दृश्यम 2 या चित्रपटाने केलीय.
मुंबई : अजय देवगण याचा दृश्यम 2 हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धमाका करतोय. हा चित्रपट 18 नोव्हेंबरला रिलीज झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाॅक्स ऑफिसवर बाॅलिवूडचे चित्रपट काही खास कामगिरी करू शकत नव्हते. आता रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी अजयच्या दृश्यम 2 या चित्रपटाने केलीय. विशेष म्हणजे दृश्यम 2 रिलीज झाल्यानंतर वरुण धवनचा भेडिया आणि आयुष्मान खुराना याचा अॅन अॅक्शन हिरो हे चित्रपट रिलीज झाले. मात्र, या चित्रपटांकडे पाठ फिरून प्रेक्षकांनी दृश्यम 2 चित्रपट बघण्यावर भर दिला.
सुरूवातीपासूनच दृश्यम 2 या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. दृश्यमच्या पहिल्या भागाप्रमाणेच दृश्यम 2 ला देखील प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय. चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल 23 दिवस होत असताना देखील बाॅक्स आॅफिसवर हा चित्रपट धमाकेदार कामगिरी करतोय.
विशेष म्हणजे आता दृश्यम 2 हा चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झालाय. सुरूवातीपासूनच चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर धमाका केला. रिलीज होऊन चाैथ्या शनिवारी दृश्यम 2 ने बाॅक्स ऑफिसवर तब्बल 4.65 कोटींचे कमाई केलीये हे सर्वात विशेष आहे.
200 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाल्याने दृश्यम 2 हा चित्रपट यंदाच्या वर्षीचा दुसऱ्या क्रमाकांचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ब्रह्मास्त्र या चित्रपटाने 267 कोटींचे कमाई केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अनेक कलाकारांनी आरोप केला होता की, करण जोहर चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांमध्ये हेराफेरी करत आहे.
आतापर्यंत अजय देवगणच्या दृश्यम 2 या चित्रपटाने 203.57 कोटींची कमाई केलीये. अजूनही चित्रपट बाॅक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. यामुळे या आकड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वरुण धवनच्या चित्रपटाला दृश्यम 2 मुळे मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे.