अजय देवगणचा ‘थँक गॉड’ चित्रपट रिलीजपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात, वाचा काय घडले?
थँक गॉड चित्रपटाविरोधात न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे असे म्हटले आहे. चित्रपटात भगवान चित्रगुप्त यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप आहे.
मुंबई : अजय देवगणचा (Ajay Devgn) थँक गॉड हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येतोय. मात्र, चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदच मोठा वाद निर्माण झालाय. अजयच्या या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सातत्याने केली जातंय. इतकेच नाही तर वकील मोहनलाल शर्मा यांनी चित्रपटाच्या (Movie) प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीये. यामुळेच आता थँक गॉड चित्रपटाच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालीये. याचिकेत म्हटले आहे की, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT platform) आणि चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाऊ नये.
थँक गॉड चित्रपटाविरोधात न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे असे म्हटले आहे. चित्रपटात भगवान चित्रगुप्त यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप आहे. आता हे सर्व प्रकरण थेट न्यायालयात गेले आहे. चित्रपटात चित्रगुप्तांचा अपमान केल्याने कायस्थ समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे म्हणण्यात आले असून चित्रपटाविरोधात कायस्थ समाजाचा रोष वाढत जातोय.
इतकेच नाही तर याचिकेत म्हटले आहे की, काहीही झाले तरी कायस्थ समाज हा चित्रगुप्तांचा अपमान सहन करणार नाही. जर थँक गॉड चित्रपट रिलीज झाला तर देशातील शांतता खराब होऊ शकते असे हे याचिकेत नमुद करण्यात आले. हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे हा चित्रपट रिलीज होणार की नाही याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.