अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांनी केला थेट मुंबई मेट्रोमधून प्रवास, अभिनेत्यांना बघताच चाहत्यांनी…

अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 या चित्रपटाला नकार देण्याचे कारणही जाहिर केले. अक्षय कुमार हा म्हणाला होता की, मला हेरा फेरी 3 चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली नाहीये, यामुळे मी चित्रपटाला नकार दिला आहे.

अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांनी केला थेट मुंबई मेट्रोमधून प्रवास, अभिनेत्यांना बघताच चाहत्यांनी...
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 2:30 PM

मुंबई : बाॅलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कोरोनानंतर अक्षय कुमार याचे चित्रपट एका मागून एक असे बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत. मुळात म्हणजे पठाण चित्रपट (Movie) सोडला तर इतर बाॅलिवूड चित्रपटांना बाॅक्स आॅफिस धमाका करण्यात यश मिळत नाहीये. काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट सतत फ्लाॅप जात आहेत. यामध्ये आमिर खान आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचा देखील समावेश आहे. अक्षय कुमार याने काही दिवसांपूर्वीच हेरा फेरी 3 या चित्रपटाला नकार दिलाय. अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 या चित्रपटाला नकार देण्याचे कारणही जाहिर केले. अक्षय कुमार हा म्हणाला होता की, मला हेरा फेरी 3 चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली नाहीये, यामुळे मी चित्रपटाला नकार दिला आहे. अक्षय कुमार हा सध्या बाॅलिवूडचा एकमेव अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षात तब्बल चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अनेकदा यावरून अक्षय कुमार याला टार्गेट देखील केले जाते. अक्षय कुमार हा कायमच आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देतो.

सध्या अक्षय कुमार हा त्याच्या आगामी सेल्फी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमार या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. सेल्फी या चित्रपटामध्ये अक्षय कुमार याच्यासोबत इम्रान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत आहे.

अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मी यांनी आज चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. सेल्फी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मी हे थेट मुंबईच्या मेट्रोमध्ये पोहचले. या दोघांना पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला.

View this post on Instagram

A post shared by @varindertchawla

कुठल्याही कार्यक्रमामध्ये न जाता अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मी मुंबईच्या मेट्रोमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसले. दरम्यान, या दोघांनीही चेहऱ्यावर मास्क घातले होते.

अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी सामान्य लोकांसारखे मेट्रो स्टेशनवर पोहचले आणि मेट्रोमध्ये बसले. काही वेळ बसल्यानंतर जेव्हा प्रमोशनसाठी डान्सर्सची एन्ट्री झाली, तेव्हा लोकांना समजले की, आपण प्रवास नेमका कोणासोबत करत आहोत.

अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांनी चेहऱ्यावरील मास्क काढत मुंबईच्या मेट्रो ट्रेनमध्ये मैं खिलाडी तू अनारी या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. अक्षय कुमार याला डान्स करताना पाहून मेट्रो ट्रेनमधील प्रवासी मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करत होते.

यावेळी अनेकांनी अक्षय कुमार याच्यासोबत सेल्फी घेण्यासही सुरूवात केली. त्यानंतर अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी हे पोलिसांच्या संरक्षणात स्टेशनबाहेर आल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. अक्षय कुमार याचा हा सेल्फी चित्रपट 14 तारखेला रिलीज होतोत.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.