Na Jaa | ‘सूर्यवंशी’चे ‘ना जा’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला, अक्षय कुमार-कतरिना कैफच्या धमाकेदार मुव्ह्सवर प्रेक्षकही धरतील ठेका!

अभिनेता अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' (Sooryavanshi)  चित्रपटातील 'ना जा' (Na Jaa) हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे ‘न जा’ या पंजाबी गाण्याचे रिमिक्स व्हर्जन आहे जे पाव धैर्याने गायले होते. हे रिमिक्स व्हर्जन तनिष्क बागची यांनी रिक्रिएट केले आहे आणि धैरा यांनी गायले आहे.

Na Jaa | ‘सूर्यवंशी’चे ‘ना जा’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला, अक्षय कुमार-कतरिना कैफच्या धमाकेदार मुव्ह्सवर प्रेक्षकही धरतील ठेका!
Na jaa Song
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 1:00 PM

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi)  चित्रपटातील ‘ना जा’ (Na Jaa) हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे ‘न जा’ या पंजाबी गाण्याचे रिमिक्स व्हर्जन आहे जे पाव धैर्याने गायले होते. हे रिमिक्स व्हर्जन तनिष्क बागची यांनी रिक्रिएट केले आहे आणि धैरा यांनी गायले आहे.

‘ना जा’ हे 3 मिनिटांचे गाणे रोहित शेट्टीच्या शैलीतील खास हेलिकॉप्टर, कॅरेज आणि मोठ्या बॅकड्रॉप डान्सर्ससह सुरु होते. अक्षय आणि कतरिना दोघेही या गाण्यात काळ्या रंगाचे पोशाख परिधान केलेले दिसत आहेत आणि एकत्र खूप क्लासी दिसत आहेत.

पाहा गाणे :

या गाण्यातही जुन्या गाण्यासारखाच भरपूर उत्साह आहे. गाण्याचे हिंदीत भाषांतर केले गेले आहे. पाव धैर्याने हे रिमिक्स व्हर्जन निकितासोबत गायले आहे. तसे, हे गाणे या फेस्टिव्ह सीझनचे चार्ट बस्टर गाणे ठरणार आहे. अक्षय कुमारच्या म्हणण्यानुसार हे गाणे यंदाचे मोठे पार्टी अँथम असणार आहे. हे गाणे शेअर करताना पाव धैर्याने लिहिले की, अक्षय कुमार आणि कतरिना कैफ माझ्या गाण्यावर डान्स करत आहेत. हे खरे आहे यावर माझा विश्वासही बसत नाहीये. याआधी ‘आयला रे आयला’ आणि ‘मेरे यारा’ या चित्रपटातील दोन्ही गाण्यांना चांगलीच पसंती मिळाली आहे.

‘या’ दिवशी चित्रपट प्रदर्शित होणार

‘सूर्यवंशी’ हा चित्रपट दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते. यापूर्वी हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता. परंतु, कोरोनामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. यानंतर, असे म्हटले जात होते की, हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार होता, परंतु नंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चित्रपट पुढे ढकलण्यात आला. आता अखेर हा चित्रपट 5 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

5200 स्क्रीन्सवर चित्रपट झळकणार

रोहित शेट्टी हा चित्रपट मोठ्या धुमधडाक्यात प्रदर्शित करत आहे. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट जगभरात 5200 स्क्रीन्सवर रिलीज होत आहे. देशांतर्गत चित्रपट 4000 स्क्रीन्सवर प्रदर्शित होत असून, हा आकडा आणखी वाढू शकतो असे बोलले जात आहे.

चित्रपटाची कमाई

रिपोर्ट्सनुसार, चित्रपट पहिल्या दिवशी 30 कोटींहून अधिक कमाई करू शकतो आणि कलेक्शन असेच सुरू राहिल्यास चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड बनवू शकतो. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. दुसरीकडे, रणवीर सिंह आणि अजय देवगण यांनी चित्रपटात कॅमिओ केला आहे.

हेही वाचा :

Mann Zaal Bajind | ‘बाजिंद’ रायाचं रूपडं बदलणार, मालिकेत लवकरच दिसणार रायाचा नवीन लूक!

Ankita Lokhande : डेस्टिनेशन वेडिंग नाही तर ‘या’ ठिकाणी करणार लग्न, जाणून घ्या अंकिता लोखंडे बॉयफ्रेंड विकी जैनसोबत कुठे घेणार 7 फेरे?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.