Akshay Kumar: आपल्या फ्लॉप चित्रपटांसाठी अक्षयने ‘या’ व्यक्तीला ठरवलं जबाबदार

या वर्षी अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' आणि 'सम्राट पृथ्वीराज' या वर्षी प्रदर्शित झाले. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकले नाहीत. त्याचा 'रक्षाबंधन' हा चित्रपटसुद्धा फ्लॉप ठरला.

Akshay Kumar: आपल्या फ्लॉप चित्रपटांसाठी अक्षयने 'या' व्यक्तीला ठरवलं जबाबदार
Akshay KumarImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 6:47 PM

कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) येत्या 10 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचा तिसरा सिझन आहे. नव्या सिझनच्या एका एपिसोडमध्ये अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) हजेरी लावली. या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. या व्हिडीओमध्ये अक्षय त्याच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल बोलताना दिसत आहे. अक्षयने त्याच्या फ्लॉप चित्रपटांसाठी (Flop Films) एका व्यक्तीला जबाबदार ठरवलं आहे. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून कॉमेडियन कपिल शर्माच आहे.

अक्षयचा ‘कटपुतली’ हा चित्रपट 2 सप्टेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याने अभिनेत्री रकुल प्रीत सिंगसोबत ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली.

हे सुद्धा वाचा

शोच्या प्रोमोमध्ये कपिल अक्षयला विचारतोय, “तुम्ही प्रत्येक वाढदिवशी एक वर्षाने लहान कसे होता?” त्यावर मस्करीत अक्षय म्हणतो, “हा माणूस माझ्या प्रत्येक गोष्टीला नजर लावतो. माझ्या चित्रपटांना, पैशांना त्याने नजर लावली. आता त्यामुळे कोणतेच माझे चित्रपट चालत नाहीयेत.” हे ऐकताच प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.

या वर्षी अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ आणि ‘सम्राट पृथ्वीराज’ या वर्षी प्रदर्शित झाले. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकले नाहीत. त्याचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपटसुद्धा फ्लॉप ठरला.

अक्षयचा ‘कटपुतली’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला असून यामध्ये त्याच्यासोबत रकुल, सरगुन मेहता आणि चंद्रचूड सिंग यांच्याही भूमिका आहेत. ‘द असॅसिन’ या चित्रपटातील कथेपासून प्रेरणा घेत ‘कटपुतली’ बनवल्याचं दिग्दर्शक रणजित तिवारी यांनी सांगितलं.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....