Akshay Kumar | अखेर अक्षय कुमार याने चित्रपटाच्या फी संदर्भातील चर्चांवर सोडले माैन, म्हणाला…

अक्षय कुमार याला खिलाडी कुमार म्हणून देखील ओळखले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत.

Akshay Kumar | अखेर अक्षय कुमार याने चित्रपटाच्या फी संदर्भातील चर्चांवर सोडले माैन, म्हणाला...
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 3:16 PM

मुंबई : अक्षय कुमार त्याच्या आगामी सेल्फी या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. अक्षय कुमार (Akshay Kumar) हा बाॅलिवूडमधील असा एकमेव अभिनेता आहे, ज्याचे दरवर्षी चार ते पाच मोठ्या बजेटचे चित्रपट रिलीज होतात. अनेकदा काहीजण यामुळे अक्षय कुमार याच्यावर टीका देखील करतात. अक्षय कुमार कायमच त्याच्या फिटनेसकडे लक्ष देतो. रात्री दहाच्या अगोदर झोपणे आणि सकाळी चार वाजता उठून व्यायाम करणे हा अक्षय कुमारचा नित्यक्रम आहे. अक्षय कुमार याला खिलाडी कुमार म्हणून देखील ओळखले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. एका मागून एक असे तब्बल तीन चित्रपट अक्षय कुमार याचे फ्लाॅप गेले आहेत.

अक्षय कुमार याला काही दिवसांपूर्वी चित्रपट फ्लाॅप जाण्याचे कारण विचारण्यात आले होते. यावेळी बोलताना अक्षय कुमार म्हणाला होता की, माझे चित्रपट फ्लाॅप जाण्यास मीच कारणीभूत आहे. यामध्ये दुसऱ्या कोणाचाही दोष नाहीये. प्रेक्षकांना काय हवे याकडे मी लक्ष द्यायला हवे.

बऱ्याचदा अक्षय कुमार चित्रपटासाठी तगडी फी आकारतो, असा आरोप केला जातो. असे म्हटले जाते की, अक्षय कुमार हा एका चित्रपटासाठी तब्बल ५० ते १०० कोटी फी घेतो.

नुकताच सेल्फी या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च वेळी पैपराजी यांनी अक्षय कुमार याला मोठ्या फी विषयी प्रश्न विचारला असता. अक्षय कुमार याने अत्यंत मजेदार पध्दतीने उत्तर दिले आहे.

अक्षय कुमार म्हणाला, माझे रिएक्शन चांगले असते…आणि असले पण पाहिजे…कारण ही सकारात्मक गोष्ट आहे ना…आता अक्षय कुमार याचे हे बोलणे चर्चेचा विषय ठरला आहे.

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार हा कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहचला होता. यावेळी अक्षय कुमार मजेदार शैलीमध्ये कपिल शर्मा याची फिरकी घेताना म्हणाला की, कपिलची नजर लागल्यामुळेच माझे चित्रपट चालत नाहीयेत.

२०२३ हे वर्ष देखील अक्षय कुमार याच्यासाठी खास ठरणार आहे. कारण या वर्षामध्येही अक्षय कुमार याचे मोठ्या बजेटचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अक्षय कुमार याच्यासोबत सेल्फी या चित्रपटामध्ये इमरान हाश्मी देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. आता अक्षय कुमार याचा सेल्फी चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.