Akshay Kumar | खिलाडी कुमार पोहोचला काश्मीरमध्ये, शाळेसाठी 1 कोटींची देणगी, सैनिकांसोबत जोरदार भांगडा!

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा सध्या काश्मीरमध्ये पोहोचला आहे. गुरुवारी (17 जून) अक्षय कुमारने भारतीय सैन्य दलाच्या सैनिकांशी भेट घेतली आणि त्यांच्यासोबत भांगडा नृत्यही केले. या दरम्यान, अक्षयने काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील नीरू गावात शाळा बांधण्यासाठी एक कोटी रुपयांची देणगीही दिली आहे.

Akshay Kumar | खिलाडी कुमार पोहोचला काश्मीरमध्ये, शाळेसाठी 1 कोटींची देणगी, सैनिकांसोबत जोरदार भांगडा!
अक्षय कुमार
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 6:52 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा सध्या काश्मीरमध्ये पोहोचला आहे. गुरुवारी (17 जून) अक्षय कुमारने भारतीय सैन्य दलाच्या सैनिकांशी भेट घेतली आणि त्यांच्यासोबत भांगडा नृत्यही केले. या दरम्यान, अक्षयने काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील नीरू गावात शाळा बांधण्यासाठी एक कोटी रुपयांची देणगीही दिली आहे. ऑनलाईन माध्यमांच्या वृत्तानुसार, आज दुपारी अक्षय कुमारने गुरेझ सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळील नीरू गावाला भेट दिली होती (Akshay Kumar reached in Kashmir donates 1 cr to build school in neeru village).

गावाला भेट दिल्यानंतर अक्षय कुमारने शाळेसाठी एक कोटी रुपये देण्याचे ठरवले. या दरम्यान अक्षयने नीरू गावातच सीमा सुरक्षा दलासह भारतीय सैन्य दलाच्या इतर सैनिकांची भेट घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले. जवळच बीएसएफचे युनिटची पोस्ट आहे, तिथे अक्षयने भारतीय सैनिक आणि स्थानिक लोकांसह जोरदार भांगडाही केला.

बीएसएफ जवानांसह अक्षय कुमार

बीएसएफने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अक्षय कुमार आणि बीएसएफचे डीजी राकेश अस्थाना यांचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये राकेश अस्थाना आणि अक्षय कुमार हे देशातील शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना बीएसएफने कॅप्शनमध्ये लिहिले आहे – बीएसएफचे डीजी राकेश अस्थाना यांनी एका समारंभात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सीमा रक्षकांना पुष्पांजली वाहिली. यावेळी अभिनेता अक्षय कुमारही डीजी बीएसएफसमवेत हजर होते आणि वीर शहिदांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

त्याचवेळी बीएसएफ काश्मीरच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओही पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आपण बीएसएफ जवानांनसह अक्षय कुमार पाहू शकता. त्यांनी अक्षय कुमारचे फुलांनी स्वागत केले. हा व्हिडीओ शेअर करताना बीएसएफ काश्मीरने लिहिले की, ‘देश स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी दाखल होत आहे आणि अक्षय कुमार पुन्हा एकदा सीमेचे रक्षण करणाऱ्या देशातील शूर सैनिकांना भेटायला आले आहेत.’

अक्षय कुमारला पुन्हा एकदा भारतीय सैनिकांसोबत पाहून त्याचे चाहते खूप आनंदी झाले आहेत. अक्षयने नीरू गावातील शाळेच्या बांधकामासाठी दिलेल्या देणगीचेही चाहते कौतुक करत आहेत.

(Akshay Kumar reached in Kashmir donates 1 cr to build school in neeru village)

हेही वाचा :

PHOTO | कोरोना रुग्णांना मिळतेय विशेष हास्यथेरेपी! ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’चा अनोखा उपक्रम

Video | ‘तेरे ड्रीम मे मेरी एंट्री, मेरे ड्रीम मे तेरी एंट्री’, ‘कोव्हिशिल्ड’ घेताना राखीने केलं नव्या गाण्याचं प्रमोशन, पाहा व्हिडीओ

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.