Akshay Kumar: “इतिहासाच्या पुस्तकात हिंदू राजांसाठी मोजक्या ओळी, मुघलांविषयी बरंच काही”; अक्षय कुमारचं वक्तव्य चर्चेत
अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) हा चित्रपट येत्या 3 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय हा सम्राट पृथ्वीराज चौहान (Samrat Prithviraj Chauhan) यांची भूमिका साकारतोय.
अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj) हा चित्रपट येत्या 3 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय हा सम्राट पृथ्वीराज चौहान (Samrat Prithviraj Chauhan) यांची भूमिका साकारतोय. तर मिस वर्ल्डचा किताब जिंकलेली मानुषी छिल्लर यातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. अभिनेता सोनू सूद आणि संजय दत्त यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयने भारतीय इतिहासावर प्रतिक्रिया दिली. “आपल्या शालेय पुस्तकात सम्राट पृथ्वीराज चौहान आणि आपल्या हिंदू राजांबद्दल फक्त चार ओळी लिहिलेल्या आहेत. पण मुघल साम्राज्याच्या इतिहासाबाबत संपूर्ण माहिती आहे. याकडे धर्माच्या नाही तर संस्कृतीच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे”, असं तो म्हणाला.
काय म्हणाला अक्षय?
“आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये सम्राट पृथ्वीराज चौहान यांविषयी दोन-तीनच ओळी आहेत. पण आक्रमणकर्त्यांविषयी बरंच काही लिहिलेलं आहे. आपण मुघलांविषयी जाणून घ्यायला हवं, पण आपल्या राजांबद्दलही माहिती असायला हवी. तेसुद्धा महान होते. मी शिक्षण मंत्र्यांना विनंती करेन की हे संतुलन साधता येईल का, याचा विचार त्यांनी करावा”, असं अक्षय म्हणाला. अक्षय कुमारने केलेल्या वक्तव्यानंतर काही ट्विटर युजर्सनी त्याचा विरोध केला. सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्यावर पूर्ण धडा असल्याचं काहींनी सांगितलंय. तर काहींनी अक्षयच्या वक्तव्याचं समर्थन केलं.
पहा व्हिडीओ-
#WATCH | Nobody is there to write about it in our history books. I would like to appeal to the Education Minister to look into this matter and see if we can balance it. We should know about Mughals but know about our kings also, they were great too: Actor Akshay Kumar to ANI pic.twitter.com/05WKtQ4dNw
— ANI (@ANI) June 1, 2022
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया-
There are two entire chapters about Prithviraj Chauhan in NCERT Class 7 history textbook. Lekin Canada Kumar ko propaganda se fursat mile tab wo padhega na.
PS: Mughals were our kings too pic.twitter.com/1FycTI3kJp
— Musab Qazi (@musab1) June 1, 2022
What were these actors doing in History classes? The Maurya empire, Gupta empire, Cholas and Chalukyas. Did they bunk those classes? ?♂️
— Joysun_Dsouza✋ (@DsouzaJoysun) June 1, 2022
याविषयी बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी म्हणाले, “आपला इतिहास हा वैदिक काळापासून सुरू होतो. पण वैदिक कालखंडाचा इतिहास आणि चंद्रगुप्त मौर्यांबद्दल फक्त एकच परिच्छेद लिहिला जातो. त्यानंतर आपण काहीच केलं नाही का, असं नाहीये. त्या काळात भारताचा मोठा इतिहास घडून गेलाय. पण ज्यांनी इतिहास लिहिला, त्यांनी अनेक गोष्टी लपवल्या आहेत.”
‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट येत्या 3 जून रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. यामध्ये मानुषी छिल्लर ही संयोगिताची भूमिका साकारणार आहे.