चक्क अक्षय कुमार याने अनुपम खेर यांना थांबण्याचा सल्ला दिला, चर्चांना उधाण
अनुपम खेर चित्रपटांमध्ये जबरदस्त आणि धडाकेबाज भूमिका करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा ऊंचाई चित्रपट अनुपम खेर यांचा रिलीज झालाय.
मुंबई : अनुपम खेर यांनी बाॅलिवूडमध्ये एक काळ गाजवला आहे. विशेष म्हणजे वयाच्या ६७ व्या वर्षी देखील अनुपम खेर (Anupam Kher) चित्रपटांमध्ये जबरदस्त आणि धडाकेबाज भूमिका करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा ऊंचाई हा चित्रपट अनुपम खेर यांचा रिलीज झालाय. या चित्रपटामध्ये अनुपम खेर आणि अमिताभ बच्चन हे मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट चार मित्रांच्या सुंदर अशा मैत्रीवर आधारित आहे. विशेष म्हणजे कोरोनानंतर बाॅलिवूडचे चित्रपट (Movie) फ्लाॅप जात असतानाच ऊंचाई या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. इतकेच नाहीतर यादरम्यान जान्हली कपूर हिचा मिली, सोनाक्षी सिन्हा हिचा डबल XL आणि कतरिना कैफ हिचा फोन भूत हे चित्रपट रिलीज झाले होते. मात्र, या तिन्ही चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. त्या तुलनेत अनुपम खेर यांच्या ऊंचाई चित्रपटाला प्रतिसाद मिळाला.
अनुपम खेर हे ६७ वर्षांचे असताना देखील ते आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देत आहेत. अनुपम खेर यांची बाॅडी पाहून खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार देखील हैराण झालाय. लवकरच अनुपम खेर यांचा शिव शास्त्री बालबोआ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अक्षय कुमार याने नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अनुपम खेर यांचे काैतुक केले. या पोस्टमध्ये अक्षय कुमार याने लिहिले की, प्रिय अनुपम खेर जी… तुम्ही आता थांबा… मी तुम्हाला बॉडी तयार करण्यास सांगितले होते, पण तुम्ही ते खूपच गांभीर्याने घेतले.. पोस्टर जबरदस्त आहे. #ShivShastriBalboa साठी तुम्हाला शुभेच्छा…असे अक्षय कुमार याने पोस्टमध्ये म्हटले आहे.
Dearest @AnupamPKher ! Stop it now! मैंने आपको बॉडी बनाने को कहा था! पर आपने तो कुछ ज़्यादा ही seriously ले लिया l Poster looks interesting. Good luck for #ShivShastriBalboa! Keep Going!?? pic.twitter.com/VG9CMUZ2X5
— Akshay Kumar (@akshaykumar) January 24, 2023
अनुपम खेर यांच्या शिव शास्त्री बालबोआ या चित्रपटातील भूमिकेसाठी अक्षय कुमार याने अनुपम खेर यांचे मनोबल वाढवले होते. शिव शास्त्री बालबोआ या चित्रपटामध्ये अनुपम खेर हे एका पहलवानाच्या भूमिकेत आहेत.
या चित्रपटासाठी अनुपम खेर यांनी अत्यंत मेहनत घेतलीये. अनुपम खेर याचा हा चित्रपट १० फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शिव शास्त्री बालबोआ या चित्रपटाच्या भूमिकेसाठी अनुपम खेर यांचे सर्वत्र काैतुक केले जात आहे.
अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, माझ्या रिलीज होणाऱ्या नव्या चित्रपटाचे नाव आहे #ShivShastriBalboa ही एक साधारण व्यक्तीची असाधारण गोष्ट आहे. हा चित्रपट बघितल्यावर तुम्ही फक्त हसणार नाहीतर आत्मविश्वासाची एक सुंदर भावनाही जागृत होईल…