Akshay Kumar | अक्षय कुमार याने या व्यक्तीला केले एप्रिल फूल, व्हिडीओ पाहून चाहत्यांना बसला धक्का
बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा कायमच चर्चेत असतो. नुकताच अक्षय कुमार याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. ज्यामुळे तो चर्चेत आलाय. गेल्या काही दिवसांपासून चित्रपट सतत फ्लाॅप जात असल्याने अक्षय कुमार याने अत्यंत मोठा निर्णय घेत आपल्या फिसमध्ये मोठी घट केलीये.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. अक्षय कुमार याचे एका मागून एक असे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला. अक्षय कुमार हा सेल्फी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला होता. अक्षय कुमार याचे एका मागून एक असे तब्बल पाच चित्रपट फ्लाॅप गेले आहेत. अक्षय कुमार हा बाॅलिवूडमधील (Bollywood) असा एकमेंव अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षाला चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात.
गेल्या काही दिवसांपासून चित्रपट सतत फ्लाॅप जात असल्याने अक्षय कुमार याने अत्यंत मोठा निर्णय घेत आपल्या फिसमध्ये मोठी घट केलीये. अक्षय कुमार हा सर्वाधिक फिस घेणारा अभिनेता होता. अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 चित्रपटाला नकार दिल्याने तो चर्चेत आला होता. आपल्याला चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली नसल्याने हेरा फेरी 3 ला नकार दिल्याचे सांगताना अक्षय कुमार दिला.
हेरा फेरी 3 चित्रपटात अक्षय कुमार हा दिसणार नसल्याचे कळताच चाहत्यांमध्ये निराशा बघायला मिळाली. अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यन हा हेरा फेरी 3 मध्ये दिसणार असल्याची चर्चा होती. मात्र, सर्वांना मोठा धक्का देत अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 चित्रपटाला होकार दिला. हेरा फेरी 3 चित्रपट निर्माता यादरम्यान अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन या दोघांच्या देखील संपर्कात होते.
View this post on Instagram
अक्षय कुमार हा सोशल मीडियावरही कायम सक्रिय असतो. आपल्या चाहत्यांसाठी तो कायमच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. नुकताच अक्षय कुमार याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये अक्षय कुमार हा मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे अक्षय कुमार याचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडलाय.
अक्षय कुमार याने सोशल मीडियावर जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये तो मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये अक्षय कुमार हा मनीषला त्याचे वजन किती आहे, हे विचारताना दिसतोय. मग अक्षय कुमार हा एका व्यक्तीच्या मदतीने हाताने मनीषला उचलतो. त्यानंतर अक्षय मनीषला तेच करायला सांगतो. मनीष हा अक्षय कुमार याला उचलू शकत नाही.
परत अक्षय कुमार हा मनीषला उचलतो. मात्र, त्यावेळी मनीषला अक्षय कुमार हा काय मस्ती करतो आहे हे माहिती नाही. यानंतर कमी वजनाच्या मुलांना उचलण्यास अक्षय कुमार हा मनीषला सांगतो. परंतू मनीष ते ही करू शकत नाही. आता अक्षय कुमार याचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अक्षय कुमार हा मनीषला एप्रिल फुल बनवतो. अक्षय कुमार याचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.