Akshay Kumar: अक्षय कुमारला कोरोनाची लागण; ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ला राहू शकणार नाही हजर

अत्यंत प्रतिष्ठित 'कान फिल्म फेस्टिव्हल' (Cannes Film Festival) हा येत्या 17 मे पासून सुरू होत आहे. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये यावेळी भारताला 'कंट्री ऑफ ऑनर' म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे अक्षय हा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह भारताचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी कान महोत्सवात सहभागी होणार होते.

Akshay Kumar: अक्षय कुमारला कोरोनाची लागण; 'कान फिल्म फेस्टिव्हल'ला राहू शकणार नाही हजर
Akshay KumarImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 8:26 AM

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारला (Akshay Kumar) कोरोनाची (Covid 19) लागण झाली आहे. यामुळे यंदाच्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ला (Cannes Film Festival) तो हजर राहू शकणार नाही. अक्षयने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. अत्यंत प्रतिष्ठित ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ हा येत्या 17 मे पासून सुरू होत आहे. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये यावेळी भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’ म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे अक्षय हा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह भारताचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी कान महोत्सवात सहभागी होणार होते. ‘कान 2022 च्या इंडिया पॅव्हेलियनमध्ये आपल्या चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी तिथे हजर राहणार होतो. पण दुर्दैवाने मला कोरोनाची लागण झाली’, असं अक्षयने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय.

अक्षय कुमारचं ट्विट-

‘कान 2022 च्या इंडिया पॅव्हेलियनमध्ये आपल्या चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी तिथे हजर राहणार होतो. पण दुर्दैवाने माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आता आराम करेन. अनुराग ठाकूर तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप शुभेच्छा’, असं अक्षयने म्हटलंय. वर्षभरात अक्षयला कोरोनाची लागण झाल्याची ही दुसरी वेळ आहे. एप्रिल 2021 मध्ये त्यांने ट्विट केलं होतं की त्याच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ‘मी सर्वांना कळवू इच्छितो की, कोरोना चाचणीचा माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सर्व प्रोटोकॉलचं पालन करून मी ताबडतोब स्वतःला क्वारंटाइन केलं आहे. मी होम क्वारंटाईनमध्ये आहे आणि आवश्यक वैद्यकीय सेवेची मागणी केली आहे. मी सर्वांना विनंती करतो, जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी आणि काळजी घ्यावी,’ असं त्याने लिहिलं होतं. अक्षय कोरोनातून बरा झाल्यानंतर पत्नी ट्विंकल खन्ना हिने त्याच्यासोबतचं एक व्यंगचित्र शेअर करून चाहत्यांना त्याच्या तब्येतीची माहिती दिली होती.

अक्षयच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच ‘पृथ्वीराज’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून ‘मिस वर्ल्ड 2017’ मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. अक्षय आणि मानुषीसोबतच यामध्ये सोनू सूद आणि संजय दत्त यांच्याही भूमिका आहेत. येत्या 3 जून रोजी हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.