कधीकाळी ‘वेटर’ म्हणून करायचे काम, आता बॉलिवूडवर राज्य करतायत ‘हे’ कलाकार!

मुंबईला स्वप्नांचे शहर म्हटले जाते. बॉलिवूडमध्ये स्टार बनण्याच्या इच्छेने दरवर्षी मोठ्या संख्येने तरुण मुंबईत येतात. कोणत्याही गॉडफादरशिवाय बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्यांना आपला ठसा उमटवण्यासाठी बराच काळ संघर्ष करावा लागतो.

कधीकाळी ‘वेटर’ म्हणून करायचे काम, आता बॉलिवूडवर राज्य करतायत ‘हे’ कलाकार!
अक्षय कुमार, बोमन इराणी, रणदीप हुडा
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 7:15 AM

मुंबई : मुंबईला स्वप्नांचे शहर म्हटले जाते. बॉलिवूडमध्ये स्टार बनण्याच्या इच्छेने दरवर्षी मोठ्या संख्येने तरुण मुंबईत येतात. कोणत्याही गॉडफादरशिवाय बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्यांना आपला ठसा उमटवण्यासाठी बराच काळ संघर्ष करावा लागतो. तर, स्टार किड्सचा उद्योगात प्रवेश अशा गावांमधून आणि शहरांमधून येणाऱ्या कलाकारांपेक्षा सोपा आहे. आज आपण अशा कलाकारांबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडण्यापूर्वी वेटर म्हणून काम केले आहे.

हे कलाकार आजही अभिमानाने आपल्या पूर्वायुष्याबद्दल सांगतात, कारण त्यांच्याकडे कोणतेही काम नसताना हा त्यांच्या कठीण काळाचा एक भाग होता. पैसे कमवण्यासाठी आणि आयुष्य चालवण्यासाठी कोणतेही काम करणे आवश्यक होते. पण असं म्हणतात की, स्वप्नांची उडी एक दिवस नक्कीच यशस्वी होते. आजघडीला हे बॉलिवूड कलाकार ‘वेटर’पासून इंडस्ट्रीचे टॉप स्टार बनले आहेत.

बोमन इराणी (Boman Irani)

बोमन इराणी यांनी वयाच्या 42व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर बोमन यांनी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये वेटर आणि रूम सर्व्हिस कर्मचारी म्हणून दोन वर्षे काम केले. यानंतर त्यांनी स्वतःची बेकरी सुरू केली आणि आईबरोबर त्यात काम केले. एके दिवशी बोमन नृत्यदिग्दर्शक श्यामक डावरला भेटले आणि मग त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

अक्षय कुमार (Akshay Kumar)

बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अक्षय कुमार बँकॉकमध्ये होता. या काळात त्याने आपला खर्च भागवण्यासाठी शेफ आणि वेटर म्हणूनही काम केले. अक्षयने बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1991 साली आलेल्या ‘सौगंध’ या चित्रपटातून केली होती. आज अक्षयची गणना बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या अभिनेत्यांमध्ये केली जाते. त्याची वार्षिक कमाई अनेक शंभर कोटी आहे.

रणदीप हुडा  (Randeep Hooda)

प्रत्येक भूमिकेत जीव ओतणाऱ्या रणदीप हुडाचा बॉलिवूड प्रवास सोपा नव्हता. तो उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नला गेला, त्या काळात त्याने रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम केले आणि तेथे राहण्याचा खर्च भागवला. एवढेच नाही तर त्याने कार धुण्यापासून ते टॅक्सी चालवण्यापर्यंतचे काम केले. आज त्याची गणना बॉलिवूडमधील सर्वात हुशार अभिनेत्यांमध्ये केली जाते.

रणवीर सिंह (Ranveer Singh)

आपली शैली, अभिनय आणि चित्रपटांसाठी ओळखला जाणारा अभिनेता रणवीर सिंह आज इंडस्ट्रीतील सर्वात मोठे नाव आहे. करण जोहरचा प्रसिद्ध शो ‘कॉफी विथ करण’मध्ये रणवीरने खुलासा केला होता की, त्याने अमेरिकेत वेटर म्हणूनही काम केले होते. रणवीरने सांगितले की, तो अमेरिकेतील स्टारबक्स कॉफी हाऊसमध्ये ग्राहकांना कॉफी देत ​​असे. त्यानंतर रणवीर भारतात परतला आणि त्याने बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावले.

नवाजुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Siddiqui)

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याने सुतार, कुली आणि बस कंडक्टरपासून ते चौकीदारापर्यंतच्या सगळ्या नोकऱ्या केल्या आहेत. पण आज हा सामान्य दिसणारा व्यक्ती बॉलिवूडचा स्टार बनला आहे.

हेही वाचा :

पित्याच्या ‘काळ्या कमाई’पासून मुलांना दूर ठेवणार, शिल्पा शेट्टी राज कुंद्राचं घर सोडून वेगळी राहणार?

लग्नाचं नातं टिकवण्यासाठी समंथा अक्किनेनी मनोरंजन विश्वाचा निरोप घेणार? जाणून घ्या नेमकं काय म्हणाली अभिनेत्री…

सोनम कपूरला मोठा धक्का, संजय लीला भन्साळींच्या आगामी चित्रपटातून दाखवला बाहेरचा रस्ता?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.