Akshay Kumar | राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर सुर्यावर शुभेच्छांचा वर्षाव, अक्षय कुमारने ट्विट करत म्हटले की…

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सेलेब्स अभिनेता सुर्याला अभिनंदनाचे संदेश पाठवत आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने तमिळ अभिनेता सुर्याचे अभिनंदन केले आहे. अक्षय कुमारने ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'सूरराई पोतरु' चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सन्मानित करण्यात आले.

Akshay Kumar | राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर सुर्यावर शुभेच्छांचा वर्षाव, अक्षय कुमारने ट्विट करत म्हटले की...
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 11:08 AM

मुंबई : 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकताच करण्यात आली आहे. ज्यामध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेता सुर्याच्या (Actor Surya) चित्रपटाला पुरस्कार मिळालायं. अभिनेता सुर्याचे खरे नाव सरवणन शिवकुमार आहे. त्यांच्या ‘सूरराई पोतरु’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. इतकेच नाही तर या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार (Award) ही मिळाला आहे. या पुरस्कारानंतर अभिनेता सुर्याही खूप खूश आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शुभेच्छांचा वर्षाव त्याच्यावर सुरू आहे. चाहते आणि सेलिब्रिटी (Celebrity) सर्वच त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत.

इथे पाहा अक्षय कुमारने केलेले ट्विट

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभेच्छांचा वर्षाव

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सेलेब्स अभिनेता सुर्याला अभिनंदनाचे संदेश पाठवत आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने तमिळ अभिनेता सुर्याचे अभिनंदन केले आहे. अक्षय कुमारने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘सूरराई पोतरु’ चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सन्मानित करण्यात आले. माझा भाऊ सुर्या, अपर्णा बालमुरली आणि दिग्दर्शक सुधा कोंगारा यांचे खूप खूप अभिनंदन.

इथे पाहा धनुषने केलेले ट्विट

सर्व राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन धनुषने केले

तमिळ स्टार धनुषनेही ट्विट करून अभिनेता सुर्याचे अभिनंदन केले आहे. धनुषने आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, सर्व राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. विशेषत: सूर्या सर आणि माझे चांगले मित्र जी.व्ही.प्रकाश यांना. तमिळ चित्रपटसृष्टीसाठी हा एक अत्यंत महत्वाचा आणि मोठा दिवस नक्कीच आहे. ही एक खूप अभिमानाची बाब आहे.

इथे पाहा दिव्या स्पंदनाने केलेले ट्विट

एक माणूस म्हणूनही त्याचे माझ्या मनात खूप चांगले स्थान

साऊथ स्टारचे अभिनंदन करताना दिव्या स्पंदनानेही ट्विटमध्ये लिहिले की, मी या विजयाने खूप आनंदी आहे. सुर्या एक अप्रतिम को-स्टार आहे आणि त्याचा मी आदर करते. फक्त अभिनयाच्या शैलीसाठी नव्हे तर एक माणूस म्हणूनही त्याचे माझ्या मनात खूप चांगले स्थान नक्कीच आहे.

चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये 5 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले

सुर्याच्या ‘सूरराई पोतरु’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये 5 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सुधा कोंगारा दिग्दर्शित सूरराई पोत्रू नोव्हेंबर 2020 मध्ये Amazon प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट कन्नड आणि मल्याळममध्येही त्याच शीर्षकाने डब करण्यात आला होता. या चित्रपटात सुर्या आणि अपर्णा बालमुरली यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सुर्य़ाने या चित्रपटात जबरदस्त अभिनय केला होता.

Non Stop LIVE Update
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल.
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?.
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा.
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले..
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले...
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार.
अनिल देशमुखांवर नागपुरात हल्ला, गाडीवर दगडफेक अन डोक्याला गंभीर दुखापत
अनिल देशमुखांवर नागपुरात हल्ला, गाडीवर दगडफेक अन डोक्याला गंभीर दुखापत.
बारामतीचा दादा कोण? अजित पवार की युगेंद्र? लढाई पुतण्यावरून तापली
बारामतीचा दादा कोण? अजित पवार की युगेंद्र? लढाई पुतण्यावरून तापली.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाकरे बंधू भिडले, कोणाची तोफ कोणावर धडाडली?
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाकरे बंधू भिडले, कोणाची तोफ कोणावर धडाडली?.
'थडग्यावर चादर चढवणारा, हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला जरांगे राक्षस'
'थडग्यावर चादर चढवणारा, हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला जरांगे राक्षस'.
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.