OMG 2 | ‘कर्ता करे न कर सके शिव करे सो होय ..’, अक्षय कुमारचा ‘महादेव’ लूक पाहिलात का?

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या आपले हातात असलेले प्रोजेक्ट पूर्ण करण्यात व्यस्त आहे. अक्षयकडे सध्या चित्रपटांची रांग लागली आहे. आता त्याने त्याचा आगामी चित्रपट OMG 2चे शूटिंग सुरु केले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.

OMG 2 | ‘कर्ता करे न कर सके शिव करे सो होय ..’, अक्षय कुमारचा ‘महादेव’ लूक पाहिलात का?
Akshay Kumar
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 1:57 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या आपले हातात असलेले प्रोजेक्ट पूर्ण करण्यात व्यस्त आहे. अक्षयकडे सध्या चित्रपटांची रांग लागली आहे. आता त्याने त्याचा आगामी चित्रपट OMG 2चे शूटिंग सुरु केले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.

अक्षय कुमारने चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यात तो भगवान शिवाच्या अवतारात दिसत आहे. पोस्टर शेअर करताना अक्षयने लिहिले की, ‘कर्ता करे न कर सके शिव करे सो होय… तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. OMG 2, आम्ही तुमच्यासमोर एक महत्त्वाचा सामाजिक प्रश्न घेऊन येत आहोत. या प्रवासातून आदियोगींची शाश्वत ऊर्जा आपल्याला आशीर्वाद देवो. सर्वत्र शिव.’

पाहा अक्षय कुमारची पोस्ट :

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

उज्जैनमध्ये शूटिंगला सुरुवात

अक्षय कुमारने रामघाट, उज्जैन येथे OMG 2 चे शूटिंग सुरू करण्यात आले आहे. असेही म्हटले जात आहे की, या चित्रपटाचे शूटिंग उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातही होणार आहे. मात्र, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भेट देणाऱ्यांना कोणतीही अडचण नाही. यासोबतच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे.

‘ओएमजी 2’मध्ये अक्षय कुमारसोबत यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की. OMG 2 चे वेळापत्रक उज्जैनमध्ये 17 दिवसांसाठी ठेवण्यात आले आहे. उज्जैन व्यतिरिक्त ओएमजी 2 चे शूटिंग इंदूरमध्येही होणार आहे. 7 नोव्हेंबरपर्यंत उज्जैन आणि इंदूरमध्ये हे शूटिंग होणार आहे.

OMG 2 हा चित्रपट 2012 मध्ये आलेल्या OMG चित्रपटाचा सिक्वेल आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात अक्षयसोबत परेश रावल मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट धार्मिक श्रद्धांवर आधारित होता. OMG 2 या चित्रपटात जुनी गोष्ट पुढे नेण्यात येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण शहरातील धार्मिक स्थळांवर करण्यात येणार आहे. या चित्रपटात चाहत्यांना काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे. ज्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते.

अक्षय कुमारही दिसणार खास भूमिकेत!

यापूर्वी चित्रपटाच्या सिक्वेलचे शूटिंग मे-जून 2021मध्ये होणार होते, पण कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर त्याचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले होते.  ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट गुजराती नाटकावर आधारित आहे. याव्यतिरिक्त, हा चित्रपट ‘द मॅन हू सूड गॉड’ या इंग्रजी चित्रपटाद्वारे देखील प्रेरित होता. ‘ओह माय गॉड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली, तर त्याचे ओपनिंग खूप संथ होते.

हेही वाचा :

Radhe Shyam : प्रभासच्या वाढदिवशी चाहत्यांना निर्मात्यांकडून खास भेट, शेअर केला ‘विक्रमादित्य’चा खास लूक टीझर!

घटस्फोटानंतर समंथाने पूर्ण केलं स्वतःचं स्वप्न, ‘सेल्फ टाईम’ला महत्त्व देत अभिनेत्री करतेय पुढे जाण्याचा प्रयत्न!

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.