Selfiee | तीन दिवसांमध्येच अक्षय कुमार याच्या ‘सेल्फी’ चित्रपटाची हवा गुल, इतक्या कोटींचे कलेक्शन
2022 हे वर्ष अक्षय कुमार याच्यासाठी अजिबात चांगले गेले नाही. कारण 2022 मध्ये अक्षय कुमार याचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप जाताना दिसले. अनेकांनी अक्षय कुमार याच्यावर टिकाही करण्यास सुरूवात केली होती.
मुंबई : बाॅलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा बहुचर्चित चित्रपट सेल्फी हा नुकताच शुक्रवारी रिलीज झालाय. या चित्रपटाकडून खूप जास्त अपेक्षा सुरूवातीपासूनच होत्या. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धमाका करण्यास अपयशी ठरला आहे. अक्षय कुमार याचा सेल्फी (Selfiee) हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार पहिला चित्रपट आहे. 2022 हे वर्ष अक्षय कुमार याच्यासाठी अजिबात चांगले गेले नाही. कारण 2022 मध्ये अक्षय कुमार याचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप जाताना दिसले. अनेकांनी अक्षय कुमार याच्यावर टिकाही करण्यास सुरूवात केली होती. अक्षय कुमार याच्या सेल्फी चित्रपटामध्ये इमरान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत आहे.
अक्षय कुमार हा बाॅलिवूडमधील अशा एकमेंव अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षात तब्बल चार चित्रपट हे चाहत्यांच्या भेटीला येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धमाका करण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत. चाहते सतत अक्षय कुमार याच्या चित्रपटाकडे पाठ फिरवत आहेत.
शाहरूख खान याचा पठाण चित्रपट रिलीज होऊन आता तब्बल 33 दिवस होऊन गेले आहेत. मात्र, अजूनही पठाण चित्रपटाची हवा बाॅक्स ऑफिसवर बघायला मिळत आहे. गेल्या आठवड्यामध्ये कार्तिक आर्यन याचा शहजादा आणि अक्षय कुमार याचा सेल्फी चित्रपट रिलीज झाला. मात्र, या दोन्ही चित्रपटांना चांगली कामगिरी करता आली नाहीये.
अक्षय कुमार याच्या सेल्फी चित्रपटाने तीन दिवसांमध्ये बाॅक्स ऑफिसवर 10.25 कोटींची कमाई केलीये. ओपनिंग डेला चित्रपटाला धमाका करता आला नाही. परंतू विकेंडला चित्रपटाच्या बाॅक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ होईल, असा अंदाजा होता. मात्र, चित्रपटाने शनिवारी 3.80 कोटी आणि रविवारी 3.90 कोटींचे कलेक्शन केले.
अक्षय कुमार याच्या सेल्फी चित्रपटाचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन पाहाता चित्रपटाचे बजेट काढणे देखील अवघड झाल्याचे दिसत आहे. सुरूवातीला सेल्फी चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ बघायला मिळत होती. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली.
अक्षय कुमार याचे चित्रपट सतत बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत. राम सेतु, रक्षा बंधन, सम्राट पृथ्वीराज हे चित्रपट देखील अक्षय कुमार याचे बाॅक्स ऑफिसवर काही खास धमाल करू शकले नाही येत. अक्षय कुमार याने नुकताच हेरा फेरी 3 या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केलीये. सुरूवातीला हेरा फेरी 3 मध्ये काम करण्यास अक्षय कुमार याने नकार दिला होता.