Ram Setu | कसा आहे अक्षय कुमारच्या राम सेतूचा ट्रेलर? नेटकरी म्हणाले…
अक्षय कुमारच्या राम सेतू या चित्रपटाचे ट्रेलर मंगळवारी रिलीज झाले आहे. या ट्रेलरमध्ये अक्षय कुमारचा एक हटके अंदाज प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल आतुरता वाढलीये.
मुंबई : अक्षय कुमार (Akshay Kumar) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या राम सेतू या बहुचर्चित चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत जॅकलिन फर्नांडिस देखील मुख्य भूमिकेत आहे. अक्षयचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून राम सेतू चित्रपटाची (Movie) वाट पाहात आहेत. अक्षय कुमारचा रिलीज झालेला रक्षाबंधन हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काही खास कमाल करू शकला नाहीये. आता राम सेतू बाॅक्स आॅफिसवर काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज (Release) होणार आहे.
इथे पाहा अक्षय कुमारची पोस्ट
You loved the first glimpse of #RamSetu… Hope you show even more love to the trailer.
और इस दिवाली, आइये अपने पूरे परिवार के साथ राम सेतु की दुनिया का हिस्सा बनने| #RamSetu. 25th October. Only in Theatres worldwide. https://t.co/Di7MEqbQGR
— Akshay Kumar (@akshaykumar) October 11, 2022
अक्षय कुमारच्या राम सेतू या चित्रपटाचे ट्रेलर मंगळवारी रिलीज झाले. या ट्रेलरमध्ये अक्षय कुमारचा एक हटके अंदाज प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल आतुरता वाढलीये. चाहत्यांना चित्रपटाचे ट्रेलर प्रचंड आवडले आहे. या चित्रपटात नुसरत भरुचा देखील मुख्य भूमिकेत आहे. अक्षय, जॅकलिन आणि नुसरतची जोडी काय धमाका करते हे पाहण्यासारखे आहे. मात्र, नेटकऱ्यांना हा ट्रेलर अजिबात आवडला नाहीये. कमेंट करत ट्रोलिंग ट्रेलरला केले जातंय.
इथे पाहा राम सेतू चित्रपटाच्या ट्रेलरचा व्हिडीओ
राम सेतू चित्रपटाची स्टोरी एका पुरातत्वशास्त्रज्ञाची आहे. ज्याला राम सेतू खरा आहे की केवळ काल्पनिक आहे याचा तपास करण्याची जबाबदारी देण्यात आलीये. जॅकलिन फर्नांडिस गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलीये. सुकेश चंद्रशेअर प्रकरणात जॅकलिनचे नाव आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. जॅकलिन फर्नांडिसमुळे बाॅक्स आॅफिस कलेक्शनवर परिणाम होऊ शकतो, असे अनेकांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर अनेकजण जॅकलिनविरोधात रोष व्यक्त करतायंत.