“आलिया भट्टमुळे मला काम मिळतंय”; पाकिस्तानी अभिनेत्रीने मानले आभार
अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) तिच्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. आलियाच्या याच प्रभावाचा फायदा आपल्यालाही होत असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरने (Hania Aamir) दिली.
अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) तिच्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. आलियाच्या याच प्रभावाचा फायदा आपल्यालाही होत असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरने (Hania Aamir) दिली. पाकिस्तानी कलाविश्वात हानिया ‘डिंपल गर्ल’ आणि हुबेहूब आलियासारखी दिसणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्या ती ‘मेरे हमसफर’ या मालिकेत हालाची भूमिका साकारतेय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आलियाशी तुलना केल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. आलिया ही मेगास्टार असल्याचं म्हणत तिने तिचे विशेष आभारही मानले. “जेव्हा आम्हा दोघांची एकमेकींशी तुलना केली जाते, तेव्हा मला आनंद होतो”, असं ती म्हणाली. (Pakistani Actress)
“मला अनेक प्रोजेक्ट्स मिळण्यामागे आलिया भट्ट हे महत्त्वाचं कारण होतं. तिच्यासारखी दिसणारी अभिनेत्री म्हणून माझी ओळख झाली. जेव्हा आलिया भारतात एखाद्या ब्रँडची जाहिरात करते, तेव्हा त्याच ब्रँडची कंपनी पाकिस्तानमधील जाहिरातीसाठी मला ऑफर देते”, असं हानिया म्हणाली.
हानियाचे फोटो-
View this post on Instagram
आलियाच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली. आलियाच्या करिअरमधील ही सर्वांत आव्हानात्मक भूमिका होती. सध्या ती ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये ती रणवीर सिंगसोबत भूमिका साकारणार आहे. याशिवाय ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच आलिया आणि रणबीर एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.