Shamshera | आलिया भट्टला शमशेरा कसा आवडला? स्वत: रणबीर कपूर म्हणाला की, चित्रपट पाहून माझी बायको खूप आनंदी आहे

शमशेरा रिलीज झाल्यावर आलियाने 'कपूर' लिहिलेला कस्टमाईज केलेला टी-शर्ट घालून त्याला चीअर अप केले. एका मुलाखतीदरम्यान रणबीरने आलियाला शमशेरा कसा आवडला हे सांगितले. रणबीर म्हणाला की, आलियाने चित्रपट पाहिला आणि तिला हा चित्रपट प्रचंड आवडला. माझ्या आयुष्यातील हा एक मोठा टिक मार्क आहे

Shamshera | आलिया भट्टला शमशेरा कसा आवडला? स्वत: रणबीर कपूर म्हणाला की, चित्रपट पाहून माझी बायको खूप आनंदी आहे
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 9:20 AM

मुंबई : रणबीर कपूर (Ranbir kapoor) आणि संजय दत्तचा स्टारर चित्रपट शमशेरा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात संजय दत्त आणि रणबीर कपूरसोबत वाणी कपूर देखील मुख्य भूमिकेत आहे. रणबीर कपूरचा शमशेरा (Shamshera) धमाका करण्याच्या तयारीत आहे. शमशेराला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोयं. रणबीरच्या शमशेरावर आलियाने देखील रिव्यू घेतला आहे. यावर आता रणबीरने भाष्य केले. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt)नेहमीच एकमेंकांना सपोर्ट करताना दिसतात. आलिया अनेकदा रणबीरच्या कामाचे कौतुक करते.

शमशेरा रिलीज झाल्यानंतर आलियाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

शमशेरा रिलीज झाल्यावर आलियाने ‘कपूर’ लिहिलेला कस्टमाईज केलेला टी-शर्ट घालून त्याला चीअर अप केले. एका मुलाखतीदरम्यान रणबीरने आलियाला शमशेरा कसा आवडला हे सांगितले. रणबीर म्हणाला की, आलियाने चित्रपट पाहिला आणि तिला हा चित्रपट प्रचंड आवडला. माझ्या आयुष्यातील हा एक मोठा टिक मार्क आहे. माझी बायको घरात आनंदी आहे, म्हणून मी आनंदी आहे. शमशेराच्या प्रमोशन दरम्यान रणबीर आलिया भट्टचे कौतुक करताना अनेकदा दिसला होता.

हे सुद्धा वाचा

शमशेरा चित्रपटाच्या माध्यमातून रणबीर तब्बल चार वर्षांनी पडद्यावर

शमशेरा चित्रपटाच्या माध्यमातून रणबीर तब्बल चार वर्षांनी पडद्यावर वापस दिसला आहे. शमशेराला चांगले रिव्ह्यू मिळत आहेत. शमशेरा रणबीर कपूरच्या चित्रपट रेकॉर्ड मोडू काढण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटात एकीकडे रणबीर कपूरने खमेराच्या सरदार शमशेराची भूमिका साकारली आहे. तर संजय दत्त शुद्ध सिंहच्या भूमिकेत दिसला आहे. शमशेराचे खूप कौतुक होत आहे. संजय दत्तचाही रोल आणि अभिनय लोकांना प्रचंड आवडताना दिसतो आहे. चित्रपटात रणबीर कपूरसोबत वाणी कपूर, संजय दत्त, सौरभ शुक्ला आणि रोनित रॉय भूमिका आहेत.करण मल्होत्राने चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.