आलिया भट्ट चक्क म्हणाली की, माझ्या मुलीला मी चित्रपटांपासून…
आलियाने केलेल्या एका विधानामुळे चाहत्यांच्या पदरामध्ये निराशा पडण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर चर्चेत आहेत. नुकताच आलिया भट्टने एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. चाहते आलिया आणि रणबीरच्या मुलीची झलक पाहण्यास प्रचंड उत्सुक आहेत. मात्र, आलियाने केलेल्या एका विधानामुळे चाहत्यांच्या पदरामध्ये निराशा पडण्याची दाट शक्यता आहे. रणबीर आणि आलिया यांची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. या दोघांच्या लग्नानंतर त्यांच्या फॅन फाॅलोइंगमध्ये मोठी वाढ झालीये.
आलिया आणि रणबीरच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाका केला. इतकेच नाही तर ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही आलिया सहभागी झाली होती. ब्रह्मास्त्र चित्रपटातील रणबीर आणि आलियाची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली.
चाहते जरी आलिया आणि रणबीरच्या मुलीची झलक पाहण्यास उत्सुक असतील तरी देखील आलियाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हे स्पष्ट केले की, ती तिच्या बाळाला लाईम लाईटपासून दूर ठेऊ इच्छित आहे. इतकेच नाही तर आलिया म्हणाली होती की, माझ्या मुलीला चित्रपटांपासून देखील दूर ठेवणार आहे.
आलिया पुढे म्हणाली की, माझ्या बाळाच्या आयुष्यामध्ये कोणाचीच दखल मला अजिबात चालणार नाहीये. यामुळे आलिया आता तिच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करणार का? हा मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. आलिया मुलीचे नाव नेमके काय ठेवणार हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.
आलियाने दिलेल्या या मुलाखतीनंतर एका चर्चेला असेही उधाण आले आहे की, मुलीला चित्रपटांपासून दूर ठेवणार म्हणजे नक्की आलियाला म्हणायचे काय आहे. आलियाने रणबीरसोबत पहिल्यांदा चित्रपटामध्ये काम करण्याचा अनुभव शेअर करताना रणबीरच्या अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत.