Net Worth | रॉयल लाईफ जगते आलिया भट्ट, दरवर्षी कमावते करोडो रुपये! जाणून घ्या अभिनेत्रीच्या नेटवर्थविषयी…

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या सतत तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीची तगडी फॅन फॉलोव्हिंग आहे.

Net Worth | रॉयल लाईफ जगते आलिया भट्ट, दरवर्षी कमावते करोडो रुपये! जाणून घ्या अभिनेत्रीच्या नेटवर्थविषयी...
आलिया भट्ट
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 10:01 AM

मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या सतत तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीची तगडी फॅन फॉलोव्हिंग आहे. आलिया भट्टचे काम बॉलिवूडमध्ये सर्वांनाच आवडते, त्याचबरोबर प्रेक्षकांसह टीकाकारांकडूनही अभिनेत्रीला भरपूर प्रेम मिळते. आलिया भट्ट हिचा जन्म 1993मध्ये झाला होता. ती मुंबईतच वास्तव्य करते. सध्या अभिनेत्री रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.  असं म्हटलं जात आहे की, लवकरच हे कपल लग्न बंधनात अडकू शकते.

कॅकनॉलेज डॉट कॉमच्या मते, आलिया भट्टची संपत्ती 10 कोटी डॉलर आहे, भारतीय रुपयांमध्ये ती 74 कोटी रुपये आहे. आलिया भट्ट हिला प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवण्याची खूप आवड आहे, यामुळे अभिनेत्री स्वतःसाठी नवीन घरे खरेदी करत असते. आलिया भट्टने काही महिन्यांपूर्वी जुहूमध्ये स्वत:साठी आलिशान घर विकत घेतले होते, त्यानंतर तिने रणबीर कपूरच्या इमारतीत देखील स्वत:साठी घर खरेदी केले आहे. या अभिनेत्रीने ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केले. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि सतत सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

आलिया भट्ट ही बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. तिच्याकडे बरेच मोठे ब्रँड, तसेच बरेच मोठे चित्रपट आहेत. जिथे अभिनेत्री सतत बर्‍याच मोठ्या चित्रपटांमध्ये काम करत असते. याशिवाय आलिया भट्टकडेही अनेक प्रकारची वाहने आहेत. अभिनेत्री बर्‍याचदा शूटिंगसाठी आपल्या या लक्झरी गाड्यांमधून जाते.

आलिया भट्टचे कार कलेक्शन

ऑडी क्यू7, (New Audi Q7)

ऑडी क्यू5 (Audi Q5)

ऑडी ए6 (Audi A6)

बीएमडब्ल्यू 7 सीरीज (BMW 7 series)

लँड रोवर (Land Rover)

रेंज रोवर (Range Rover)

दरवर्षी कमावते कोट्यावधी रुपये!

आलिया भट्ट दरवर्षी 6 कोटी रुपये कमवते. आगामी काळात ‘आरआरआर’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘ब्रह्मास्त्र’ या बिग बजेट चित्रपटांसह अनेक बड्या चित्रपटांमध्ये अभिनेत्री झळकणार आहे. आलिया भट्टने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आलिया भट्टच्या आधी ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटासाठी तब्बल 400 मुलींचे ऑडिशन घेण्यात आले होते. त्यानंतर आलिया भट्टला या चित्रपटासाठी फायनल करण्यात आले होते. त्यानंतर आपल्या दमदार अभिनयामुळे आलियाने कधीच मागे वळून पाहिले नाही.

(Alia Bhatt lives Royal Life, earns crores of rupees every year know about her net worth)

हेही वाचा :

Ani Kay Hava : जुई आणि साकेत लवकरच भेटीला, ‘आणि काय हवं’च्या तिसऱ्या सीझनची घोषणा

प्रसिद्ध गायक अनु मलिक यांना मातृशोक, शेवटच्या काळात आजीच्या सोबत होता नातू अरमान मलिक

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.