लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच रणबीर कपूर कंटाळा?, Alia Bhatt हिने केली पोलखोल, म्हणाली…

बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच आगामी चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी आलिया भट्ट ही कश्मीरला गेली होती. विशेष म्हणजे शूटिंगला आलिया ही मुलगी राहा हिला देखील घेऊन गेली होती. नुकताच आलिया भट्ट हिने मोठा खुलासा केलाय.

लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच रणबीर कपूर कंटाळा?, Alia Bhatt हिने केली पोलखोल, म्हणाली...
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 7:02 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी 14 एप्रिल 2022 रोजी अचानक लग्न करत सर्वांना मोठा धक्का दिला. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी एकमेकांना तब्बल पाच वर्ष डेट केले आणि मग लग्नाचा निर्णय घेतला. आलिया भट्ट हिने 6 नोव्हेंबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा असे ठेवले. आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर (Social media) खास पोस्ट शेअर करत मुलीचे नाव आणि तिच्या नावाचा अर्थही सांगून टाकला. मात्र, अजूनही आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या मुलीची झलक चाहत्यांना दाखवली नाही. गेल्या काही दिवसांपासून आलिया ही तिच्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसत आहे.

नुकताच आलिया भट्ट हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये आलिया ही रणबीर कपूर याच्याबद्दल सांगताना दिसत आहे. आलिया भट्ट म्हणाली की, रणबीर कपूर हा अत्यंत शांत आणि साधू टाईप माणूस आहे. काहीही झाले तरीही रणबीर हा कायम शांत असतो. मी चिडलेली देखील त्याला अजिबात आवडत नाही.

कोणतीही परिस्थिती असो रणबीर हा कायमच शांत असतो. मात्र, ज्यावेळी मला राग येतो त्यावेळी माझा आवाज वाढतो आणि मी जोरात बोलायला किंवा चिडचिड करायला सुरूवात करते. मात्र, माझी ही सवय रणबीर कपूर याला अजिबातच आवडत नाही. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर याचा तू झूठी में मक्कार हा चित्रपट रिलीज झालाय.

विशेष म्हणजे तू झूठी में मक्कार या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रणबीर कपूर हा दिसला होता. चित्रपटाच्या प्रमोशन वेळी रणबीर कपूर आपल्या खासगी आयुष्याबद्दल सांगताना देखील दिसला होता. रणबीर कपूर म्हणाला होती की, मी आलिया आणि माझी मुलगी राहा हिला प्रचंड मिस करतोय…आलिया आणि राहा मुंबईत नसून आलिया तिच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी कश्मीरला गेलीये.

काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट ही तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडन येथे पोहचली होती. यावेळी आलिया भट्ट हिची आई, बहीण, रणबीर कपूर आणि काही मित्र देखील त्यांच्यासोबत होते. आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर तिच्या वाढदिवसाचे अनेक फोटो हे शेअर केले होते. आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून सतत तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.