Ala Vaikunthapurramuloo | सचिन खेडेकर बनला अल्लू अर्जुनचा आजोबा! आणखी एक तेलुगू सिनेमा हिंदीतून करणार अजूबा?

Ala Vaikunthapurramuloo in Hindi : अल्लू अर्जुनसोबत या सिनेमात तब्बूनेही मोठी भूमिका पार पडली होती. तसंच मराठमोठा सचिन खेडेकरही या सिनेमात एका मुख्य भूमिकेत दिसला होता.

Ala Vaikunthapurramuloo | सचिन खेडेकर बनला अल्लू अर्जुनचा आजोबा! आणखी एक तेलुगू सिनेमा हिंदीतून करणार अजूबा?
अल्लू अर्जुनचा आणखी एक सिनेमा हिंदीतून प्रेक्षकांच्या भेटीला
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 8:23 PM

दक्षिणेतील सुपरस्टार अल्लू अर्जूननं आपलं एक वेगळं फॅन फॉलोईंग महाराष्ट्र आणि बॉलिवूड सिनेमे पाहणाऱ्यांमध्ये तयार केलंय. आपल्या Action साठी ओळखल्या जाणाऱ्या अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी पुष्पा दी राईज (Pushpa The Rise) सिनेमाच्या तेलुगू सोबत हिंदी वर्जनलाही तुफान प्रतिसाद दिला. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमानं आपली कमाल सुरुच ठेवली आहे. अशातच आता लवकरच अल्लू अर्जूनचा 2020 साली आलेला ‘आला वैकुंठपुर्रमुलो’ हा सिनेमा आता हिंदीतही प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही जारी करण्यात आली आहे. बुक माय शोनं याबाबत ट्वीट करत चाहत्यांना बुकिंगसाठीचं आवाहनही केलं आहे. पुजा हेगडे (Pooja Hegde) आणि अल्लू अर्जुनची (Allu Arjun) खास केमिस्ट्री या सिनेमात पाहायला मिळाली होती. दरम्यान, हा सिनेमा हिंदी रिलीज करण्यात आला नव्हता. आता पुष्पा द राईज या सिनेमाच्या हिंदी वर्जनला मिळालेला प्रतिसाद पाहून आता ‘आला वैकुंठपुर्रमुलो’ हा सिनेमाही हिंदीत बॉक्सऑफिसवर काय कमाल करुन दाखवतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

किती तारखेला रीलिज?

अल्लू अर्जुनचा ‘आला वैकुंठपुर्रमुलो’ हा सिनेमा येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे 26 जानेवारीला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा तेलुगू भाषेत बघितलेल्या सगळ्यांनाच आता या सिनेमाच्या हिंदी वर्जनचीही उत्सुकता लागली आहे. अल्लू अर्जुनसोबत या सिनेमात तब्बूनेही मोठी भूमिका पार पडली होती. तसंच मराठमोठा सचिन खेडेकरही या सिनेमात एका मुख्य भूमिकेत दिसला होता. तब्बू या सिनेमात अल्लू अर्जुनची आई तर सचिन खेडेकर या सिनेमा अल्लू अर्जुनच्या आजोबांच्या भूमिकेत पाहायला मिळालेत.

कोरोनामुळे अनेक सिनेमे लांबणीवर

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका अनेक सिनेमांना बसलाय. अनेक सिनेमांचं प्रदर्शन लांबणीवर पडलंय. काहींनी आपल्या प्रदर्शनाच्या तारखाही पुढे ढकललेल्या आहेत. अशातच पुष्पा द राईज सिनेमानं महिन्याभरानंतरही बॉक्स ऑफिसवर आपली जादू कायम ठेवली होती. त्यात आता अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी आणखी एक खूशखबर मिळाली असून आता चाहत्यांचं या सिनेमाच्या प्रदर्शनाकडे लक्ष लागलंय.

संबंधित बातम्या :

Video | #srivalli | मटकीला मोड नाय, Pushpa मधील स्रीवल्लीच्या मराठी वर्जनला तोड नाय! अमरातवीच्या पोरांची कमाल

Saami Saami | Video | आजीबाई जोमात, आजीबाईंचे ठुमके पाहून रश्मिका आणि समांथाही कोमात! दादी नव्हे, ‘मौज कर दी!’

Udayanraje Bhonsle | मित्रांसोबत सिनेमागृहात,पुष्पा चित्रपटाच्या प्रेमात; उदयनराजेंनी लुटला आनंद

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.