Pathaan Box Office | फक्त भारतामध्येच नाही तर या देशांमध्येही ‘पठाण’चा जलवा, RRR सह या चित्रपटांचे रेकाॅर्ड मोडणार?

पठाण चित्रपटाची धमाकेदार कामगिरी सुरू आहे. याच वर्षात शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खान हे देखील बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.

Pathaan Box Office | फक्त भारतामध्येच नाही तर या देशांमध्येही 'पठाण'चा जलवा, RRR सह या चित्रपटांचे रेकाॅर्ड मोडणार?
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 2:25 PM

मुंबई : शाहरुख खान याने पठाण (Pathaan) चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर दणदणीत असे पुनरागमन केले आहे. २०१९ मध्ये शेवटी शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला आणि शाहरुख खान याने बाॅलिवूडपासून चार हात लांब राहणे पसंत केले. २०२३ हे वर्ष शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्यासाठी अत्यंत खास आहे. कारण चार वर्षांनंतर बाॅलिवूडमध्ये पुनरागमन करून थेट चित्रपटाने भारतामध्ये बाॅक्स आॅफिसवर ११ दिवसांमध्ये तब्बल ४३० कोटींचे कलेक्शन केले. पठाण या चित्रपटाला फक्त भारतामध्येच नाही तर विेदेशात देखील प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. जगभरातून पठाण या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल ८५० कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन करत अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत. शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट पठाणच ठरला आहे. शाहरुख खान याच्यासाठी २०२३ हे वर्ष यासाठी खास आहे की, पठाण चित्रपटाची धमाकेदार कामगिरी सुरू आहे. याच वर्षात शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खान हे देखील बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.

पठाण चित्रपटाची घोषणा झाल्यापासून मोठा वाद निर्माण झाला होता. काहींनी तर थेट पठाण चित्रपटाचे नाव बदलण्याचीच मागणी केली होती. मात्र, यादरम्यान शाहरुख खान याने कोणत्याच गोष्टीवर भाष्य करणे टाळले होते. चित्रपटाला बजरंग दलासह अनेक संघटनांनी विरोध केला होता.

चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चित्रपटाच्या विरोधात वातावरण बघायला मिळत होते. बेशर्म रंग गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने या वादाला तोंड फुटले होते.

पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाला आणि चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये बघायला मिळाली. चित्रपटाने पहिल्याच दिवशी जबरदस्त असे बाॅक्स आॅफिस कलेक्शन करत सर्वांनाच मोठा धक्का दिला.

पठाण या चित्रपटाने ओपनिंग डेला भारतामधून तब्बल ५४ कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले तर जगभरामधून तब्बल १०० कोटींचे कलेक्शन केले. तेंव्हापासूनच पठाण चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर करण्यास सुरूवात केलीये.

अमेरिकेमध्येही शाहरुख खान याची जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे. USA मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या बाॅलिवूड चित्रपटाच्या यादीमध्ये पठाणचा समावेश झाला असून पठाण हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आहे. बाहुबली २ या चित्रपटाने USA मध्ये १६९ कोटींचे कलेक्शन केले.

आरआरआर चित्रपटाने USA मध्ये १२२ कोटीचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. पठाण या चित्रपटाने USA मध्ये ११५ कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले आहे. विशेष म्हणजे पुढील काही दिवसांमध्ये हा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. कमाईच्या आकड्यांमध्ये आरआरआर चित्रपटाला देखील पठाण हा चित्रपट मागे टाकू शकतो.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....