Ameesha Patel: अमिषा पटेलविरोधात वॉरंट जारी; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या इव्हेंट कंपनीचे व्यवस्थापक पवन वर्मा यांनी 2017 मध्ये अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी मुरादाबादमध्ये खटला सुरू होता.

Ameesha Patel: अमिषा पटेलविरोधात वॉरंट जारी; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?
Ameesha Patel: अमिषा पटेलविरोधात वॉरंट जारीImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 11:13 AM

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलविरोधात (Ameesha Patel) कोर्टाने वॉरंट जारी केलं आहे. मुरादाबादच्या ACJM-5 न्यायालयाने अमिषाच्या विरोधात हे वॉरंट (Warrent) जारी केलं आहे. न्यायालयाने दिलेल्या तारखेला न्यायालयात हजर न राहिल्याने अमिषा पटेलविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं जाऊ शकतं. त्यानुसार अमिषाला 20 ऑगस्ट रोजी ACJM-5 न्यायालयात (Court) हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 11 लाख रुपये घेऊन कार्यक्रमाला न पोहोचल्याचा आरोप अमिषावर आहे. हे प्रकरण पाच वर्षे जुनं आहे. पैसे घेऊन ऐनवेळी कार्यक्रमाला न पोहोचल्याने ती कायदेशीर अडचणीत सापडली आहे.

रिपोर्ट्सनुसार, अमिषा पटेलने एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 11 लाख रुपये ॲडव्हान्स घेतले होते. मात्र ऐनवेळी ती कार्यक्रमाला हजर राहिली नाही. अमिषा एका लग्न समारंभात सहभागी होणार होती. त्यासाठी तिने आगाऊ रक्कम घेतली होती.

काय आहे प्रकरण?

कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या इव्हेंट कंपनीचे व्यवस्थापक पवन वर्मा यांनी 2017 मध्ये अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी मुरादाबादमध्ये खटला सुरू होता. अमिषाविरुद्ध कलम 120-बी, 406, 504 आणि 506 अंतर्गत खटला सुरू आहे. तक्रारदाराच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने अमिषा आणि तिच्या साथीदारांना समन्स पाठवले आहेत.

हे सुद्धा वाचा

अजामीनपात्र वॉरंट जारी केलं जाऊ शकतं

वॉरंटनंतरही अमिषा कोणत्याही वैध कारणाशिवाय कोर्टात हजर राहिली नाही, तर तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी केलं जाऊ शकतं, असं समन्समध्ये म्हटलं आहे. मंगळवारी कोर्टाने अमिषाविरोधात वॉरंट जारी केलं आहे. अमिषा पटेल कायदेशीर अडचणीत सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही ती चेक बाऊन्सच्या प्रकरणांमुळे वादात सापडली होती.

Non Stop LIVE Update
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.