Gadar 2 | ‘गदर 2’ चित्रपटात पुन्हा एकदा दिसणार अमिषा पटेल-सनी देओलची जोडी, लवकर होणार मोठी घोषणा!

बॉलिवूडची सुपरहिट जोडी पुन्हा एकदा परत आली आहे. सनी देओल आणि अमीषा पटेल पुन्हा एकदा अनिल शर्माच्या चित्रपटात दिसणार आहेत. ‘गदर - एक प्रेम कथा’ आता पुढे जाईल आणि पुन्हा एकदा आपण तारा आणि सकीनाच्या प्रेमाचे साक्षीदार होऊ.

Gadar 2 | ‘गदर 2’ चित्रपटात पुन्हा एकदा दिसणार अमिषा पटेल-सनी देओलची जोडी, लवकर होणार मोठी घोषणा!
Gadar 2
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 4:38 PM

मुंबई : बॉलिवूडची सुपरहिट जोडी पुन्हा एकदा परत आली आहे. सनी देओल आणि अमीषा पटेल पुन्हा एकदा अनिल शर्माच्या चित्रपटात दिसणार आहेत. ‘गदर – एक प्रेम कथा’ आता पुढे जाईल आणि पुन्हा एकदा आपण तारा आणि सकीनाच्या प्रेमाचे साक्षीदार होऊ. या चित्रपटाची घोषणा उद्या (15 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता केली जाईल. याआधी आज, चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा, अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमीषा पटेल यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्टर शेअर केले आहे. ज्यात 2 तसेच लिहिले आहे की, ही कथा आता पुढे जाईल.

बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol), अभिनेत्री अमीषा पटेल (Ameesha Patel) आणि अमरीश पुरी अभिनित सुपरहिट फिल्म ‘गदर : एक प्रेम कथा’ (Gadar: Ek Prem Katha) आजपर्यंत प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. तरच,  प्रत्येकजण या चित्रपटाचा भाग 2 तयार होण्याची वाट पाहत आहे. अशी अपेक्षा आहे की, लवकरच त्यांची ही प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. मेकर्स या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याचा विचार करत आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा सनी आणि अमीषाची जबरदस्त केमिस्ट्री प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येईल.

‘गदर’ चित्रपटाचे नाव उच्चारले की, तो हँडपंप उखडण्याचा सीन प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतो. हा सीन पाहून प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला होता. असेच काहीतरी पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी आता याचा खुलासा केला आहे. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, ‘गदर’ चे निर्माते यावेळी तयार होणारा सिक्वेल लक्षात घेऊन प्लॉट आणि स्क्रिप्टवर काम करत आहेत.

मुख्य जोडी म्हणून सनी-अमीषाच आघाडीवर!

जेव्हा चित्रपटाचा सिक्वेल बनतो, तेव्हाबऱ्याचदा लीडची जोडी बदलते. पण ‘गदर’च्या पार्ट 2मध्ये सनी देओल आणि अमीषा पटेलच लीड रोलमध्ये दिसतील. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु निर्मात्यांनी आत्ताच त्याबद्दलची योजना आखली आहे. याशिवाय चित्रपटाशी संबंधित अन्य कलाकारांशीही संपर्क साधला जात आहे.

उत्कर्ष देखील साकारणार महत्त्वाची भूमिका

मीडिया रिपोर्टनुसार दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्षही यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. असं म्हणतात की, चित्रपटाच्या पहिल्या भागात उत्कर्षने सनी आणि अमीषाचा मुलगा जीता याची भूमिका साकारली होती. अभिनेता म्हणून त्याने वर्ष 2018मध्ये ‘जीनियस’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

सनीला पाहून संवाद विसरायची अमीषा

2001मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’मधील सनी देओलसोबत अमीषा पटेलची केमिस्ट्री लोकांना चांगलीच आवडली होती. पण अभिनेत्री अमीषा शूटच्या वेळी सनी देओलसोबत सीन करायला खूप घाबरत असे. सनीला पाहून ती आपले संवाद विसरत होती. सनी देओलसोबतच्या एका दृश्यात तिला जवळपास 17-18 रीटेक्स द्यावे लागायचे.

हेही वाचा :

‘Money Heist Season 5’च्या दुसऱ्या भागाचा टीझर प्रदर्शित, प्रोफेसरच्या खेळीवर खिळल्यात सर्वांच्या नजरा!

Raj Kundra New Trouble : राज कुंद्राविरोधात तक्रार करण्यासाठी शर्लिन चोप्रा मुंबईतल्या जुहू पोलीस ठाण्यात

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.