Amitabh Bachchan | ‘बिग बी’ने केलेल्या घोषणेची आजही गावकऱ्यांना आस, वाचा संपूर्ण प्रकरण…
15 वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी दौलतपूर गावासंदर्भात एक मोठी घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर त्यांचे सर्वत्र काैतुकही करण्यात आले. मात्र, या घोषणेचा विसर अमिताभ बच्चन यांना पडलांय.
मुंबई : बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे 11 ऑक्टोबर 1942 रोजी अमिताभ बच्चन यांचा जन्म झाला. मात्र, बाराबंकी जिल्हाशी अमिताभ यांचे खास नाते आहे. बिग बीने बाराबंकी जिल्ह्यातील दौलतपूर गावासंदर्भात 15 वर्षांपूर्वी एक मोठी घोषणा (Declaration) केली होती. दौलतपूर गावात आज अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस (Birthday) मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. मात्र, यावेळी गावकऱ्यांनी अमिताभ बच्चन यांनी 15 वर्षांपूर्वी केलेल्या घोषणेची आठवण करून दिलीये.
15 वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी दौलतपूर गावासंदर्भात एक मोठी घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर त्यांचे सर्वत्र काैतुकही करण्यात आले. मात्र, या घोषणेचा विसर अमिताभ बच्चन यांना पडलांय. कारण गेल्या 15 वर्षांपासून अमिताभ बच्चन यांनी केलेली घोषणा कधी पूर्ण होणार याकडे समस्थ गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, व्यस्त असल्याने अमिताभ बच्चन ही घोषणा अजूनही पूर्ण करू शकत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
अमिताभ बच्चन 15 वर्षांपूर्वी या गावात आले होते आणि त्यावेळी त्यांनी गावात ऐश्वर्या राय बच्चन गर्ल्स कॉलेज स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या घोषणेला आता तब्बल 15 वर्ष उलटून जात आहेत. ऐश्वर्या राय बच्चन गर्ल्स कॉलेजची स्थापना कधी होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. आज संपूर्ण देशभरात अमिताभ बच्चन यांचा 80 वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला जातोय. चाहते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत.