अमिताभ बच्चन, शाहरुख, अजय, रणवीर सिंगविरोधात याचिका दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

बिहारमधील सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाश्मी यांनी मुझफ्फरपूरमधील न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकारीसमोर ही याचिका दाखल केली. अशा प्रकारच्या ब्रँडच्या जाहिराती करून कलाकारांनी लोकांना तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करण्यास प्रोत्साहित केल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे.

अमिताभ बच्चन, शाहरुख, अजय, रणवीर सिंगविरोधात याचिका दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?
Amitabh, Ajay, Shahrukh and RanveerImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 11:37 AM

बिहारमधील न्यायालयासमोर गुरुवारी दाखल केलेल्या याचिकेत अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यावर गुटखा आणि तंबाखूच्या सेवनाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून अजय देवगण हा तंबाखू (tobacco) ब्रँड ‘विमल’चा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. तर गेल्या वर्षी शाहरुख खानही (Shah Rukh Khan) ‘विमल’च्या जाहिरातीत झळकला. अमिताभ बच्चन यांनीसुद्धा ‘कमला पसंद’साठी ब्रँड ॲम्बेसेडरची ऑफर स्वीकारली होती. तर रणवीर सिंगनेही पान मसालाची जाहिराती केली होती. बिहारमधील सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाश्मी यांनी मुझफ्फरपूरमधील न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकारीसमोर ही याचिका दाखल केली. अशा प्रकारच्या ब्रँडच्या जाहिराती करून कलाकारांनी लोकांना तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करण्यास प्रोत्साहित केल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे.

गुटखा आणि पान मसालाची जाहिरात स्वीकारून आपल्या सेलिब्रिटी स्टेटसचा गैरवापर करणाऱ्यांमध्ये तमन्नाने अभिनेता रणवीर सिंगचं नावदेखील घेतलं आहे. या कलाकारांविरुद्ध आयपीसी कलम 311, 420, 467 आणि 468 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली असून या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात तंबाखू ब्रँड ‘विमल’च्या जाहिरातीत झळकल्यामुळे अभिनेता अक्षय कुमारवर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर अक्षयने जाहिरातीतून माघार घेतली. विमलच्या या जाहिरातीत अजय देवगण आणि शाहरुख खानदेखील होते.

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

ऑक्टोबर 2021 मध्ये अमिताभ बच्चन यांनी ‘कमला पसंद’या च्युइंग तंबाखूच्या ब्रँडसोबतचा त्यांचा करार रद्द केला होता. अमिताभ यांना काही तपशीलांची माहिती नसल्याचं त्यांच्या कार्यालयाने एका निवेदनात स्पष्ट केलं. ‘अमिताभ बच्चन हे जेव्हा ब्रँडशी जोडले गेले, तेव्हा त्यांना माहित नव्हतं की ते तंबाखूच्या जाहिरातींच्या अंतर्गत येतं. आता त्यांनी ब्रँडसोबतचा करार संपुष्टात आणला आहे. त्याचसोबत जाहिरातीसाठी मिळालेले पैसे परत केले आहेत,’ असं त्या निवेदनात म्हटलं होतं. नोव्हेंबरमध्ये बिग बींनी संबंधित कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली होती. करार संपुष्टात येऊनही कंपनीने त्यांच्या जाहिरातींचे प्रसारण सुरू ठेवल्याने त्यांनी ही नोटीस पाठवली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.