फॅशन नाही तर ‘या’ कारणामुळे अमिताभ बच्चन यांनी बांधली होती शर्टाची गाठ! वाचा ‘दीवार’चा किस्सा…

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव असतात. ते दररोज फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांशी खास स्टोरी शेअर करत असतात. अशा परिस्थितीत आता महानायकाने चाहत्यांसाठी त्यांच्या सुपरहिट चित्रपटाचा एक किस्सा शेअर करत एक गुपित उघड केले आहे.

फॅशन नाही तर ‘या’ कारणामुळे अमिताभ बच्चन यांनी बांधली होती शर्टाची गाठ! वाचा ‘दीवार’चा किस्सा...
अमिताभ बच्चन
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 10:21 AM

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सर्व वयोगटातील लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. असंख्य सुपरहिट चित्रपट देणारे अमिताभ बच्चन यांचे चाहते केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी ‘दीवार’ चित्रपटाशी संबंधित एक रंजक किस्सा त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे (Amitabh Bachchan share an interesting story behind knotted shirt in deewar film).

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव असतात. ते दररोज फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांशी खास स्टोरी शेअर करत असतात. अशा परिस्थितीत आता महानायकाने चाहत्यांसाठी त्यांच्या सुपरहिट चित्रपटाचा एक किस्सा शेअर करत एक गुपित उघड केले आहे. हे जाणून चाहत्यांना देखील आश्चर्य वाटणार आहे.

अमिताभ यांनी ‘दीवार’ चित्रपटाशी संबंधित किस्सा केला शेअर…

1975मध्ये प्रदर्शित झालेला ‘दीवार’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. आता 21 वर्षांनंतर अभिनेत्याने चित्रपटाशी संबंधित एक महत्वाची गोष्ट सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना सांगितली आहे. अलीकडे, अमिताभ यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, जो दीवार चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घेण्यात आला होता.

म्हणून बांधली शर्टाची गाठ!

‘बिग बीं’नी शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ते निळ्या रंगाच्या शर्ट आणि पांढऱ्या रंगाच्या पँटमध्ये दिसले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्याचा स्टायलिश लूक दिसला आहे. यासह अभिनेत्याने एक खास कॅप्शनही लिहिले आहे. अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, ‘माझ्या प्रिय मित्रांनो काय दिवस होते ते… आणि गाठ मारलेले शर्ट..चित्रीकरणाचा पहिला दिवस… शॉट तयार होता आणि कॅमेरा आता रोल करणार होता. परंतु, त्याच वेळी असे लक्षात आले की, शर्ट खूप लांब आणि मोठा आहे. तो शर्ट अगदी गुडघ्या खाली होता. त्यावेळी शर्ट बदलण्यासाठी देखील पुरेसा वेळ नव्हता. मग काय सरळ त्याची एक गाठ बांधली आणि…’  चित्रपटात अमिताभ यांची ही खास शैली पुढे खूप ट्रेंड झाली. अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. चाहते या पोस्टवर विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत.

चित्रपटांची रांग

वर्क फ्रंटबद्दल बोलताना अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ सीझन 13 सध्या खूप चर्चेत आहे. बिग बींच्या या शोची नोंदणी नुकतीच संपली आहे, आता ते लवकरच या कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात करू शकतात. याशिवाय अभिनेत्याकडे ‘गुडबाय’, ‘चेहरे’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘झुंड’ असे चित्रपट देखील आहेत.

(Amitabh Bachchan share an interesting story behind knotted shirt in deewar film)

हेही वाचा :

Video | ‘नो रिस्क, नो स्टोरी’, प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यान नुसरत जहांचा स्विमिंग पूलमधील बोल्ड व्हिडीओ चर्चेत!

Photo : छोट्या गंगूबाईचं रुपडं बदललं, आता दिसते स्लीम ट्रीम

माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.