Amitabh Bachchan: ‘अबे बुढ्ढे..’ म्हणत अपमान करणाऱ्याला अमिताभ बच्चन यांचं सडेतोड उत्तर
'प्रात:काल की शुभकामनाएँ', अशी पोस्ट त्यांनी लिहिली होती. मात्र ही पोस्ट त्यांनी सकाळी 11.30 वाजता केली होती. काहींनी त्यावरून त्यांची मस्करी केली, तर काहींनी त्यावरून त्यांना ट्रोल (Trolling) केलं. 'तुम्ही खूपच लवकर सुप्रभात म्हणताय, असं नाही वाटत का', असं एकाने उपरोधिकपणे लिहिलं.
बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसाठी ते दररोज ट्विटर, फेसबुकवर विविध पोस्ट करत असतात. रविवारी त्यांनी फेसबुकवर (Facebook) चाहत्यांना ‘सुप्रभात’ म्हणणारी एक पोस्ट लिहिली, मात्र त्यावर एका युजरने अपमानास्पद कमेंट केली. ‘अबे बुढ्ढे’ असं म्हणणाऱ्याला बिग बींनी फेसबुकवर सडेतोड उत्तर दिलं. ‘प्रात:काल की शुभकामनाएँ’, अशी पोस्ट त्यांनी लिहिली होती. मात्र ही पोस्ट त्यांनी सकाळी 11.30 वाजता केली होती. काहींनी त्यावरून त्यांची मस्करी केली, तर काहींनी त्यावरून त्यांना ट्रोल (Trolling) केलं. ‘तुम्ही खूपच लवकर सुप्रभात म्हणताय, असं नाही वाटत का’, असं एकाने उपरोधिकपणे लिहिलं. तर एका युजरने ‘अबे बुढ्ढे’ म्हणत अपमानास्पद कमेंट केली.
पहिल्या ट्रोलरला उत्तर देताना बिग बींनी उशिरा पोस्ट लिहिण्यामागचं कारण सांगितलं. ‘तुम्ही मारलेल्या टोमण्यासाठी धन्यवाद. काल रात्री उशिरापर्यंत मी काम करत होतो आणि आज सकाळी उठायला उशीर झाला, त्यामुळे सुप्रभातचा मेसेज उशिरा पोस्ट केला. तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मला माफ करा’, असं त्यांनी लिहिलं. ‘अबे बुढ्ढे, दुपार होत आली’, अशा भाषेत कमेंट करणाऱ्याला बिग बींनी सडेतोड उत्तर दिलं.
वाचा त्यांची पोस्ट-
‘तुम्ही चिरायू होवो, अशी माझी प्रार्थना आणि देव करो तेव्हा तुम्हाला अपमानित करत कोणी बुढ्ढा असं म्हणू नये’, असं उत्तर बिग बींनी दिलं. त्यांच्या या उत्तराने चाहत्यांची मनं जिंकली. अनेकांनी बिग बींची बाजू घेत ट्रोलर्सना सुनावलं. ‘काहीजण अशाप्रकारे कमेंट्स करत आहेत, जसं की ते ब्रह्ममुहूर्तालाच जागे होतात’, असं एकाने म्हटलं. तर काहींनी या वयातही बिग बी रात्री उशिरापर्यंत काम करत असल्याचं कौतुक केलं.
अमिताभ बच्चन हे नुकतेच ‘रनवे 34’ या चित्रपटात झळकले. यामध्ये त्यांनी अजय देवगणसोबत भूमिका साकारली. ते लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. याशिवाय ते तमिळ आणि कन्नड चित्रपटातही काम करणार आहेत.