Amitabh Bachchan: जबरा फॅन! घरासमोर उभारला अमिताभ बच्चन यांचा पुतळा; पहा फोटो

कौन बनेगा करोडपती या शोमध्ये बिग बी ज्या पोझमध्ये बसतात, त्याच पोझमध्ये हा पुतळा बनवण्यात आला आहे. विशेष म्हणजे राजस्थानमध्ये हा पुतळा बनवून अमेरिकेत पाठवला गेला. यासाठी गोपी यांना जवळपास 75 हजार डॉलर्स म्हणजेच 60 लाख रुपयांचा खर्च आला.

Amitabh Bachchan: जबरा फॅन! घरासमोर उभारला अमिताभ बच्चन यांचा पुतळा; पहा फोटो
अमेरिकेत चाहत्याने घरासमोर उभारला बिग बींचा पुतळा Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 3:49 PM

बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा फक्त देशातच नाही तर जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करण्यासाठी तयार होतात. आता न्यूजर्सीमधल्या एका भारतीय वंशाच्या अमेरिकन कुटुंबाने त्यांच्या घराबाहेर बिग बींचा मोठा पुतळा (statue) उभारला आहे. या पुतळ्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ‘शनिवारी, 27 ऑगस्ट रोजी अमिताभ बच्चन यांचा पुतळा आम्ही आमच्या एडिसन इथल्या नव्या घराबाहेर उभारला आहे. या पुतळ्याच्या उद्घाटनप्रसंगी बिग बींचे (Big B) अनेक चाहते उपस्थित होते’, अशी पोस्ट गोपी शेठ यांनी लिहिली आहे. त्यासोबतच उद्घाटन समारंभाचे फोटो त्यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहेत.

बिग बींच्या पुतळ्याविषयी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मी आणि माझ्या पत्नीसाठी बिग बी देवासमान आहेत. त्यांच्याबद्दल मला प्रेरणा देणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे फक्त त्यांचं रिल लाइफच नाही तर त्यांचं वास्तविक जीवनसुद्धा आहे. ते ज्याप्रकारे लोकांसमोर असतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात.. ते खूपच विनम्र आहेत. ते त्यांच्या चाहत्यांची काळजी घेतात. ते इतर अनेक स्टार्ससारखे नाहीत. म्हणूनच मला माझ्या घराबाहेर त्यांचा पुतळा उभारण्याची कल्पना सुचली.”

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

गोपी हे गुजरामधून 1990 मध्ये अमेरिकेला वास्तव्यास गेले. गेल्या तीन वर्षांपासून ते बिग बींसाठी एक वेबसाइट चालवत आहेत. या पुतळ्याविषयी अमिताभ बच्चन यांनासुद्धा कल्पना होती आणि इतका मोठा मान मिळवण्यास मी पात्र नाही, असं ते गोपी यांना म्हणाले. मात्र गोपी आपल्या निर्णयावर ठाम होते. कौन बनेगा करोडपती या शोमध्ये बिग बी ज्या पोझमध्ये बसतात, त्याच पोझमध्ये हा पुतळा बनवण्यात आला आहे. विशेष म्हणजे राजस्थानमध्ये हा पुतळा बनवून अमेरिकेत पाठवला गेला. यासाठी गोपी यांना जवळपास 75 हजार डॉलर्स म्हणजेच 60 लाख रुपयांचा खर्च आला.

Non Stop LIVE Update
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.