Navya Nanda | अमिताभ बच्चन यांची नात नव्या लवकरच स्क्रीनवर दिसणार, बॉलिवूडमधुन शुभेच्छांचा वर्षाव!
नव्याची ही जाहिरात लॉरियल पॅरिसची आहे. नव्याची मामी ऐश्वर्या राय बच्चन अनेक वर्षांपासून या ब्रँडचा प्रचार करत आहे. नव्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर तिचे चाहते खूप खूश आणि उत्साहित झाले आहेत. नव्याने शेअर केलेला व्हिडीओ पाहून इंडस्ट्रीतील तिच्या मित्रांनीही कमेंट केल्या आहेत.
मुंबई : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक नव्या नवेली नंदा (Navya Nanda) लवकरच टिव्हीवर दिसणार आहे. लाइमलाइटपासून दूर असलेल्या नव्याची सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. नव्याचे अनेक चाहते आहेत, जे तिला फाॅलो करतात. लवकरच नव्या एका जाहिरातीत दिसणार आहे. या जाहिरातीची एक झलक नव्याने सोशल मीडियावर (Social media) शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये नव्या लॅपटॉपसमोर बसलेली दिसत आहे. तिच्या मागे कोणीतरी बोलताना दिसते आहे. यामध्ये नव्याला कोणीतरी विचारते की, ‘तुम्ही UN (युनायटेड नेशन्स) च्या प्रतिनिधी आहात? तू खूप तरुण आहेस तुला अनुभव नाही.” असे व्हिडीओमध्ये दिसते आहे. ही जाहिरात नेमकी कशाची याबद्दल नव्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता बघायला मिळते आहे.
नव्याची ही जाहिरात लॉरियल पॅरिसची आहे. नव्याची मामी ऐश्वर्या राय बच्चन अनेक वर्षांपासून या ब्रँडचा प्रचार करत आहे. नव्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर तिचे चाहते खूप खूश आणि उत्साहित झाले आहेत. नव्याने शेअर केलेला व्हिडीओ पाहून इंडस्ट्रीतील तिच्या मित्रांनीही कमेंट केल्या आहेत. सुहाना खान, शनाया कपूर आणि श्वेता बच्चन यांनी तिच्या पोस्टवर कमेंट केली आहे.
श्वेता बच्चनने कमेंट करत म्हटले की…
श्वेता बच्चनने लिहिले की, तू यापेक्षाही अधिक deserve करतेस. सुहाना खानने लिहिले की, ‘Ommmmmmgggg wwcoowww. शनाया कपूरने लिहिले की, ‘Navwwwillll amazing. प्रसिद्ध छायाचित्रकार रोहन श्रेष्ठ यांनी विचारले, ‘कान्सला जाणार आहात का?’ आधार जैन यांनी प्रतिक्रिया दिली, ‘Navsss याशिवाय अथिया शेट्टी आणि रिद्धिमा कपूर साहनी यांनीही हार्ट इमोजी शेअर करून नव्याचे काैतुक केले आहे.
सुहाना खान आणि अथिया शेट्टीने केले काैतुक
नव्या नवेली नंदा ही अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची नात आहे. ती श्वेता बच्चन आणि उद्योगपती निखिल नंदा यांची मुलगी आहे. नव्या मोठ्या पडद्यापासून दूर असते आणि ती एक एनजीओ चालवते. नव्याचा भाऊ अगस्त्य नंदा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘द आर्चिज’ चित्रपटात अगस्त्य नंदा, खुशी कपूर, सुहाना खान दिसणार असून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.