Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार?

दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.

Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार?
Follow us
| Updated on: Dec 27, 2020 | 10:04 AM

मुंबई : दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदा (Agstya Nanda) बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. श्वेता बच्चनला (Shweta Bachchan) तिची मुलगी नव्याच्या बॉलीवूड करिअरबद्दल नेहमीच विचारणा करण्यात येते. मात्र, आता बिग बीचा नातू अगस्त्य हाच बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार आहे. रिपोर्ट्सनुसार श्वेता नंदा आणि निखिल नंदाचा मुलगा अगस्त्य लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर नव्याचे फोटो पहात राहतो आणि श्वेताला तिच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल विचारतो. (Amitabh Bachchan’s grandson Agastya Nanda will be coming to Bollywood)

ज्यावर श्वेता नेहमीच म्हणते की, नव्यासाठी बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी हे योग्य वय नाही. पण आता अगस्त्य कॅमेर्‍यासमोर येण्यासाठी तयार असल्याचे दिसते. चित्रपट निर्माते लवकरच अगस्त्यासोबत चित्रपटाची घोषणा करू शकतात.

अगस्त्य सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. त्याच्या प्रत्येक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. त्याने काही वर्षांपूर्वी आपल्या मित्रांसह एक लघु फिल्म देखील बनवला होता. अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. ते आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही कविता, फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच अमिताभ बच्चन यांनी सोशल मिडियावर एक कविता शेअर केली होती. मात्र, त्या कवितेमुळे अमिताभ बच्चन अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवरून चहावर एक कविता शेअर केली होती मात्र, टिशा अग्रवाल नावाच्या एका महिलेचा असा दावा आहे की, अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेली कविता तिने लिहिलेली आहे.

याबद्दल अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवरही टिशाने कॅमेंट केली आहे- “सर, तुमच्या वॉलवर माझी कविता येणे हे माझे भाग्यच आहे, परंतू तुम्ही या कवितेला माझे नाव दिले असते तर मला खूप आनंद झाला असता, मला आशा आहे की, तुम्ही यावर उत्तर नक्की द्याल. यानंतर एका ट्रोलर्सने अमिताभ बच्चन यांना आठवण करून दिले की, जेव्हा कुमार विश्वास यांनी त्यांच्या कवितांमध्ये हरिवंश राय बच्चन यांच्या काही ओळी वापरल्या तेव्हा तुम्ही त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होते. आणि तुम्हीच जर टिशाचे श्रेय तिला देत नाहीत हे काय आहे? त्याचप्रमाणे अनेक जणांनी अमिताभ बच्चन यांना टिशाला तिच्या कवितेचे श्रेय द्यावे अशी विनंती केली होती. माध्यमांच्या वृत्तानुसार, 30 एप्रिल 2020 रोजी ही कविता लिहिल्याचे टिशा अग्रवालचे म्हणणे आहे. जेव्हा अमिताभ बच्चन यांची पोस्ट तिने पाहिली तेव्हा तिच्या लक्षात आले की, अमिताभ बच्चन यांनी तिची कविता शेअर केली आहे.

संबंधित बातम्या : 

बर्थ डे बॉय Salman Khan | रेंज रोवर, ऑडी, बीएमडब्ल्यू जो खेळण्यासारखा वापरतो, वाचा नेमकी संपत्ती किती?

Gauahar Khan : रिसेप्शन पार्टीत अभिनेत्री गौहर खाननं ‘झल्ला-वल्ला’ वर धरला ठेका, डान्स व्हिडीओ व्हायरल

(Amitabh Bachchan’s grandson Agastya Nanda will be coming to Bollywood)

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.