Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयीच्या ‘त्या’ ट्विटमुळे चाहते चिंतेत

रविवारी रात्री बिग बींनी (Amitabh Bachchan) एक ट्विट केलं. त्यांच्या या ट्विटमुळे चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यांचं ट्विट वाचून चाहते पेचात पडले.

अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयीच्या 'त्या' ट्विटमुळे चाहते चिंतेत
Amitabh BachchanImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 1:37 PM

बॉलिवूडचे महानायक (Bollywood Actor) अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Tweet) हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते दररोज ट्विट करत असतात. सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सचा आकडाही मोठा आहे. रविवारी रात्री बिग बींनी एक ट्विट केलं. मात्र त्यांच्या या ट्विटमुळे चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे. ‘हृदय धडधडतंय.. काळजी वाटतेय.. आणि आशा’ असं ट्विट बिग बींनी केलं. त्यांचं हे ट्विट वाचून चाहते पेचात पडले. त्यांना प्रकृतीविषयी कोणती समस्या जाणवतेय का, असा प्रश्न अनेकांना पडला. अवघ्या काही मिनिटांतच ट्विटरकरांनी त्यावर प्रतिक्रिया देत त्यांच्या आरोग्याविषयी काळजी व्यक्त केली. ‘लवकरात लवकर बरे व्हा’, अशी प्रार्थनाही अनेकांनी केली आहे. (Big B Health)

काही वेळानंतर बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये स्पष्ट केलं की, त्यांच्या शूटिंगमुळे ते चिंताग्रस्त आहेत आणि नीट अभियन करू शकेन की नाही अशी भीती त्यांना सतावत होती. ‘संवाद पाठ करणं आणि पडद्यावर योग्यरित्या परफॉर्म करणं याची चिंता सतावत होती’, असं त्यांनी त्यात म्हटलं. मढ आयलँड याठिकाणी त्यांच्या आगामी प्रोजेक्टचं शूटिंग सुरू असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

काही दिवसांपूर्वीच बिग बींचा ‘चेहरे’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. आता ते लवकरच ‘झुंड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात ते क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. याशिवाय रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. दीपिका पदुकोणसोबतचा ‘द इंटर्न’ या चित्रपटाचा हिंदी रिमेकसुद्धा त्यांनी साईन केला आहे.

संबंधित बातम्या: अमिताभ बच्चन यांच्याकडून वर्षाला दीड कोटी मिळाल्याचा आरोप, बिग बींच्या बॉडीगार्डची पोलीस आयुक्तांकडून बदली

संबंधित बातम्या: जेव्हा विनोदाच्या बादशहासमोर अभिनयाचे बादशहा आदराने झुकतात! समीर चौघुले आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ फोटोची चर्चा!

संबंधित बातम्या: प्रभास-अमिताभ बच्चन यांची जोडी एकाच चित्रपटात, प्रभास म्हणतो ‘त्यांच्यासोबत काम करणे म्हणजे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे’

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.