अक्षय कुमार याने गोरखा चित्रपट करण्यास दिला नकार? चित्रपट निर्मात्यांनी केला मोठा खुलासा

कोरोनानंतर अक्षय कुमार याच्या चित्रपटांना फटका बसताना दिसतोय.

अक्षय कुमार याने गोरखा चित्रपट करण्यास दिला नकार? चित्रपट निर्मात्यांनी केला मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 3:32 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बाॅक्स आॅफिसवर मार खाताना दिसत आहेत. एका मागून एक अक्षय कुमार याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत. अक्षय कुमार हा बाॅलिवूडमधील असा एक अभिनेता आहे की, याचे वर्षाला चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अक्षय कुमार कायमच प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलेला आहे. कोरोनानंतर अक्षय कुमार याच्या चित्रपटांना फटका बसताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी हेरा फेरी 3 मुळे अक्षय कुमार चर्चेत आला होता.

हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमार दिसणार नसल्याचे सांगितले जात आहे. अक्षय कुमार याने एका कार्यक्रमामध्ये जाहिरपणे सांगितले की, मला हेरा फेरी 3 ची स्क्रीप्ट आवडली नसल्याने मी चित्रपटाला नकार दिला आहे.

अक्षय कुमार याच्या या विधानानंतर चित्रपट निर्मात्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कारण अक्षयच्या या बोलण्याचा फटका चित्रपटाला बसून शकतो. आता अक्षय कुमारऐवजी या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन दिसणार असल्याचे सांगितले जातंय.

गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा होती की, हेरा फेरी 3 नंतर आता अक्षय कुमार याने गोरखा या चित्रपटाला देखील नकार दिला आहे. गोरखा चित्रपटाला कोणत्या कारणामुळे अक्षय याने नकार दिला, याबद्दल चर्चा सुरू होती.

गोरखा चित्रपटाबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर आता थेट चित्रपट निर्माते आनंद एल राय यांनी मोठे विधान केले आहे. गोरखा चित्रपटाला अक्षय कुमार याने करण्यास नकार दिला, या सर्व फक्त अफवा असल्याचे आनंद एल राय यांनी सांगितले.

आनंद एल राय म्हणाले, हा चित्रपट आम्ही सध्या बनवत नाहीत. काही तांत्रिक अडचणी आहेत, काही वस्तुस्थिती दुरुस्त करणे आवश्यक आहे. यामुळे सध्याच हा चित्रपट तयार केला जाणार नाहीये. मात्र, अक्षय कुमार याने नकार दिला हे चुकीचे आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.