मुंबई : अलीकडेच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या फोनमधील ड्रग्जशी संबंधित चॅटमध्ये अभिनेत्री अनन्या पांडेचे नाव आल्यामुळे अनन्या सध्या खूप चर्चेत आहे. एनसीबीने तिला अनेकवेळा चौकशीसाठी बोलावले असून, या प्रकरणात तिच्या नावाचा तिच्या कारकिर्दीवर परिणाम होत असल्याचे दिसत आहे.
ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचे करिअर ठप्प झाले आहे. तिच्या ब्रँड व्हॅल्यूचे नुकसान होत असतानाच, तिच्या आगामी चित्रपटांनाही धोका असल्याचे सांगण्यात येत आहे.
अनन्या Lakme, Vega 3 Hairstyler, Gillette Hair Removal Cream, Claity Ice Cream, Perk Chocolate, Only Clothing ब्रँड यांसारख्या कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये दिसते आणि या कंपन्या वेळोवेळी त्यांच्या जाहिरात चित्रपटांचे रीशूट करत असतात. जे या कराराचा भाग असतात. आता या ब्रँड्सच्या डीलवरही परिणाम होऊ शकतो, कारण ड्रग्ज प्रकरणात नाव आल्याने लोक अनन्याच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मोहीम चालवत आहेत. या भीतीने, ब्रँड तिला बाहेर काढू शकतात.
वास्तविक, अनन्या पांडेचे असे अनेक चित्रपट आहेत, जे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पण असे बोलले जात आहे की, या चित्रपटांचे निर्माते आणि अनन्याच्या सहकलाकारांना भीती वाटू लागली आहे की, ड्रग्जमुळे तिचा चित्रपट फ्लॉप तर होणार नाही ना…
ज्यामध्ये मोठे नाव ‘लायगर’ या चित्रपटाचे आहे, जो सुमारे 125 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. हिंदी आणि तेलुगू अशा दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट बनवला जात आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, या चित्रपटात साऊथ हार्ट थ्रोब विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत आहे. तसेच या चित्रपटाच्या चर्चेचे मुख्य कारण म्हणजे या चित्रपटात आंतरराष्ट्रीय बॉक्सर माईक टायसनची उपस्थिती आहे. पुरी जगन्नाथ यांनी लायगरचे दिग्दर्शन केले आहे.
‘लायगर’ व्यतिरिक्त अनन्या पांडेही शकुन बत्राच्या अनटाइटल्ड चित्रपटात दिसणार आहे. ज्याचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटात अनन्या पांडेशिवाय दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आहेत. या चित्रपटाची बरीच चर्चा होत असून, हा चित्रपट लवकर प्रदर्शित करण्याबाबतही विचार केला जात आहे. अनन्यावर एनसीबीची टांगती तलवार राहिली तर त्याचा चित्रपटावर नक्कीच परिणाम होऊ शकतो.
एका शोदरम्यान अनन्या पांडेने स्टारकिडच्या संघर्षांवर चर्चा केली. यावर सिद्धांत चतुर्वेदी म्हणाला होता की, ‘होय, प्रत्येकाचा स्वतःचा संघर्ष असतो हे खरे आहे, पण फरक इतका आहे की, जिथे आपली स्वप्ने पूर्ण होतात, तिथेच त्यांचा संघर्ष सुरू होतो.’
अनन्या पांडेच्या पदार्पणाबद्दल बोलायचे झाले, तर तिने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर ती ‘खाली पीली’ आणि ‘पत्नी पत्नी और वो’ या चित्रपटांमध्ये दिसली होती.
‘माझ्या मुलीने दोन वर्षात खूप काही कमावलं…’, आलिया भट्टच्या यशाने आनंदी झालेयत महेश भट्ट!