अनन्या पांडेने सुरु केले ‘लायगर’चे चित्रीकरण, ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यामुळे लागला होता ब्रेक!
अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हिला नुकतेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणी चौकशीसाठी बोलावले होते. ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यानंतर अभिनेत्रीने तिच्या सर्व चित्रपटांचे शूटिंग काही काळ थांबवले होते.
मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हिला नुकतेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणी चौकशीसाठी बोलावले होते. ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यानंतर अभिनेत्रीने तिच्या सर्व चित्रपटांचे शूटिंग काही काळ थांबवले होते. त्यामुळे तिच्या ब्रँड व्हॅल्यूवरही मोठा परिणाम झाला होता. तिला सलग दोन दिवस एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी तिचा लॅपटॉपही जप्त केला होता. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केले आहे.
अभिनेत्री तिच्या आगामी ‘लायगर’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी विजय देवरकोंडासोबत एका गाण्यासाठी शूटिंग करणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अनन्या पांडे आजपासून (28 ऑक्टोबर) तिची शूटिंग सुरू करणार आहे. या गाण्याचे शूटिंग 25 ऑक्टोबर रोजी होणार होते, परंतु अनन्याला एनसीबी कार्यालयात जावे लागल्याने शूटिंग थांबवावे लागले.
मुंबईतच होणार गाण्याचे शूट
या गाण्याचे शूटिंग मुंबईतच होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, हे गाणे चेन्नईचे बाबा भास्कर यांनी कोरिओग्राफ केले आहे. ‘लायगर’ची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन, पुरी जगन्नाथ आणि चार्मी कौर यांनी केली आहे. हा अॅक्शन ड्रामा चित्रपट बराच काळ चर्चेत होता. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ‘लायगर’मध्ये विजय देवरकोंडा आणि माईक टायसन यांच्या उपस्थितीमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी 125 कोटी रुपये खर्च आल्याचे सांगण्यात येत आहे.
या चित्रपटात रोनित रॉय, रम्या कृष्णन, विष्णू रेड्डी, अली, मकरंद देशपांडे आणि गेटअप श्रीनू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट] तेलुगु आणि हिंदीमध्ये शूट केला जात असून, इतर भाषांमध्ये डब केला जाणार आहे. ‘लायगर’ 9 सप्टेंबर 2021ला रिलीज होणार होता, पण कोरोनामुळे शूटिंगला उशीर झाला.
एनसीबीने अनन्या पांडेची दोनदा चौकशी केली
आर्यन खानसोबतच्या व्हॉट्सअॅप चॅटद्वारे अनन्या पांडेचे नाव समोर आले होते, त्यानंतर एनसीबीने अनन्याला चौकशीसाठी समन्स पाठवले होते. अनन्याची चौकशी केल्यानंतर एनसीबीचे पथक तिच्या घरी पोहोचले. अनन्या तिचे वडील चंकी पांडे यांच्यासह दोन्ही वेळा एनसीबी अधिकाऱ्यांसमोर हजर झाली होती. पहिल्या दिवसाच्या चौकशीत अनन्या वडील चंकी पांडेसोबत पोहोचली होती. चौकशी कक्षात प्रवेश करण्यापूर्वी अनन्या खूप घाबरली होती आणि वडील चंकी पांडेला मिठी मारून रडली. नंतर, अनन्या एकटीच चौकशी कक्षात दाखल झाली, जिथे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली.
विशेष म्हणजे समीर वानखेडे यांनी स्वत: अनन्याची चौकशी केली. यावेळी एक महिला अधिकारी देखील होत्या. त्यांनी अनन्याला तिच्या आर्यन सोबतच्या मैत्रीबाबत विचारलं. तसेच तिला ड्रग्स पेडलरबाबत विचारलं. तिच्यात आणि आर्यन यांच्यात झालेले संवाद तिला दाखवण्यात आले. त्या चॅटबाबत तिला विचारण्यात आलं.