Ananya Panday | बिकिनीवरील फोटो शेअर करताच अनन्या पांडे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, युजर्स म्हणाले
लाइगर चित्रपटाच्या अपयशाचे खापर हे निर्मात्यांनी शेवटी अनन्या पांडे हिच्यावर फोडले. अनन्या पांडे हिला चांगला अभिनय करता आला नाही, असे अनेकांनी म्हटले होते.
मुंबई : चंकी पांडे याची लोक अनन्या पांडे कायमच चर्चेत असते. अनन्या पांडे (Ananya Panday) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. आपल्या चाहत्यांसाठी कायमच अनन्या पांडे काही खास आणि बोल्ड फोटो शेअर करते. काही दिवसांमध्येच अनन्या पांडे हिची फॅन फाॅलोइंग जबरदस्त वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे हिचा लाइगर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाकडून खूप जास्त अपेक्षा देखील होत्या. हा बिग बजेटचा चित्रपट होता. अनन्या पांडे हिच्यासोबत लाइगर चित्रपटामध्ये साऊथ स्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) हा देखील मुख्य भूमिकेत दिसला. विशेष म्हणजे चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही चित्रपटाच्या निर्मात्यांनी बक्कळ पैसा लावला होता. सुरूवातीला प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी क्रेझ बघायला मिळत होती. परंतू प्रत्यक्षात चित्रपट (Movie) रिलीज झाल्यानंतर काही खास धमाल करण्यात चित्रपटाला यश मिळाले नाही. अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांची जोडी प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणण्यात अपयशी ठरली. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी विजय आणि अनन्या यांनी चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमात जाण्यास उशीर होत असल्याचे सांगत मुंबईच्या लोकलने प्रवास केला.
लाइगर चित्रपटाच्या अपयशाचे खापर हे निर्मात्यांनी शेवटी अनन्या पांडे हिच्यावर फोडले. अनन्या पांडे हिला चांगला अभिनय करता आला नाही, असे अनेकांनी म्हटले होते. एक अशी चर्चा देखील होती की, लाइगर चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर अनन्या पांडे हिला साऊथच्या अनेक चित्रपटाच्या आॅफर आल्या होत्या.
View this post on Instagram
लाइगर चित्रपट फ्लाॅप गेल्याने अनेक निर्मात्यांनी आता अनन्या पांडे हिच्याकडे पाठ फिरवली. लाइगर चित्रपट हिट ठरला असता तर अनन्या पांडे ही आपल्या फिसमध्येही मोठी वाढ करणार होती. मात्र, लाइगर चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. साऊथमध्ये प्रेक्षकांचे थोडेफार प्रेम मिळाले, मात्र, हिदींमध्ये तर चित्रपटाची कामगिरी नाराशाजनक राहिली.
नुकताच अनन्या पांडे हिने सोशल मीडियावर बिकिनीमधील काही खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अनन्या पांडे हिचा बोल्ड लूक दिसतोय. मात्र, हे फोटो पाहून अनेकांनी तिला आता ट्रोल करण्यास सुरूवात केलीये.
एका युजर्सने म्हटले की, कुपोषणची शिकार झालीये ही…दुसऱ्याने लिहिले की, केंडल जेनर बनण्याचा हिचा प्रयत्न दिसत आहे, परंतू तू कधीच तशी दिसू शकत नाही. अनन्या पांडे हिच्या या फोटोवर सुहाना खान हिने देखील कमेंट केलीये.